शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पणजी पोलीस ठाणे हल्ला प्रकरण: गोव्याचे मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा, पत्नी जेनिफर यांच्या पदरी निराशा

By सूरज.नाईकपवार | Updated: July 21, 2023 16:26 IST

Babush Monserrat: गाेव्याची राजधानी  पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा मिळाला तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पदरी मात्र सपशेल निराशा पडली

-  सूरज नाईक पवार मडगाव - गाेव्याची राजधानी पणजी पोलिस ठाणे हल्ला प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात यांना तात्पुरता दिलासा मिळाला तर त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या पदरी मात्र सपशेल निराशा पडली. मोन्सेरात दांपत्यांनी या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा दयावी असा अर्ज न्यायालयात केला होता. आज शुक्रवारी या अर्जावर न्यायालयाने निवाडा देताना बाबुशला सुनावणीच्या वेळी गैरहजर राहण्यास तात्पुरती सवलत दिली तर जेनिफर यांचा अर्ज फेटाळून लावला. ३० सप्टेंबर पर्यंत या खटल्याच्या सुनावणीस आता बाबुशला अनुपस्थित राहण्याची मुभा मिळाली आहे.

दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटल्याची सुनावणी चालू आहे.  शुक्रवारी सुनावणीच्या वेळी बाबुश व जेनिफर या गैरहजर होत्या. संशयितांचे वकिल तसेच सीबीआयचे वकील निशाद एम. पी. हे उपस्थित होते. तसेच पोलीस उपअधिक्षक सुदेश नाईक हेही न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी आता पुढच्या शुक्रवारी दि. २८ जुलै रोजी होणार आहे.

मागच्या सुनावणीच्या वेळी या हल्ल्यात वापरलेल्या तीन वाहने कुठे आहेत याची विचारणा न्यायालयाने केली होती. या तीन वाहनापैकी एका वाहनाचा मालक कालच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर हाेता. आपले वाहन सदया नादुरुस्त असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. हे वाहन आणण्यासाठी सरकारपक्षाने व्यवस्था करावी असे न्यायालयाने बजाविले तर अन्य दोन वाहन मालकांना कारणे दाखवा नोटीस बजवावीत व त्यांना पुढच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करावे असेही सांगण्यात आले. २००८ साली पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला प्रकरण घडले होते. यात ३७ संशयित असून, त्यातील एकाचे निधन झाले आहे

 

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय