शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

खुनी हल्ला प्रकरणातील फरार रॉनी डिसोझाला पणजी पोलिसांकडून अटक

By वासुदेव.पागी | Updated: March 20, 2024 15:54 IST

११ डिसेंबर २०२३ रोजी रात्री करंझाळे येथे सूर्यावर सुरे तलवारी घेऊन हल्ला केला होता.

पणजी :  करंझाळे येथे सूर्या ऊर्फ सूर्यकांत कांबळे याच्यावरील डिसेंबरमध्ये झालेल्या खुनी हल्ला प्रकरणातील फरारी सूत्रधार रॉनी डिसोझा याला पणजी पोलिसांनी अटक केली. रॉनी आणि सूर्या हे दोन्हीही गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असून त्यांच्याविरुद्द अनेक गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत. 

 ११ डिसेंबर २०२३ रोजी रात्री करंझाळे येथे सूर्यावर सुरे तलवारी घेऊन हल्ला केला होता. या हल्ल्यात सूर्या गंभीर जखमी झाला होता आणि त्यामुळे त्याला उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करावे लागले होते. हा हल्ला करणारे हल्लेखोर तसे अल्पवयीन होते, परंतु या. प्रकरणाचा जसजसा तपास पुढे गेला तसतसे या प्रकरणातील एक एख धागेदोरे उघड होऊ लागले. रॉनीनेच या अल्पवयीन मुलांना हा हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते असे तपासातून आढळून आले आहे.  पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण लागताच रॉनी गायब झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत फिरत होता.  रॉनी पणजी शहरात असल्याची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला अटक केली. 

सूर्यावरील हल्ला हा दोघांमधील पूर्व वैमनस्यातून झाला होता. रॉनीच्या जवळच्या माणसांना सूर्याने मारल्याचा संशय  रॉनीला होता. त्यामुळे सूडापोटी  त्याने हा डाव रचला होता आणि त्यासाठी अल्पवयीन मुलांना हाताशी धरले होते असेही तपासातून आढळून आले आहे. 

११ डिसेंबरच्या हल्ल्यात सूर्या हा पीडित ठरला असला तरी सूर्याही काही धुतल्या तांदळासारखा साफ नाही. पोलीसांच्या हिस्ट्रीशीटरांच्या यादीत सूर्याचे नाव सर्वात वर आहे. बेकायदा शस्त्रे बाळगणे, जिवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे असे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. एका पणजी पोलिसस्थानकातच त्याच्या विरुद्ध चार गुन्हे नोंद आहेत. या शिवाय पेडणे डिचोली, कळंगूट आणि साळगाव पोलीस स्थानकातही त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंद आहेत.