शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पणजी महापालिका घोटाळ्यातील संशयित कारकुनाकडून सर्व कामे काढून घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 19:57 IST

पणजी महापालिकेतील गाजलेल्या घोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त दिपक देसाई कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानच्या घडामोडीत सोपो वसुली

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 -  पणजी महापालिकेतील गाजलेल्या घोटाळ्यांच्या बाबतीत आयुक्त दिपक देसाई कोणती कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यानच्या घडामोडीत सोपो वसुली व पे पार्किंग घोटाळ्यातील संशयित अव्वल कारकून नारायण कवळेकर याला मंगळवारी कोणतेही काम न देता इमारतीत खाली अर्ज एंट्रीला घेतले जातात तेथे कोपऱ्यात बसविण्यात आले. आयुक्त देसाई यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणात आपण कठोर कारवाई करणार असल्याचा पुनरुच्चार केला. मात्र त्याचबरोबर आपल्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही, असेही सांगितले. सोमवारी मनपाच्या बैठकीत संशयितांची परेड केली गेली त्याबद्दल विचारले असता निगरगट्ट बनलेल्यांना असे केल्याशिवाय समज येत नाही, असे नमूद करुन त्यांनी अधिक काही भाष्य केले नाही. महापौर सुरेंद्र फुर्तादो यानी संशयित कर्मचारी तसेच अभियंत्याला बैठकीत बोलावून जो जाब विचारण्यात आला त्याचे समर्थन केले. नारायण हाच सर्व व्यवहार सांभाळत होता त्याच्याकडे विचारणा करण्यात काय गैर, असा उलट सवाल त्यानी केला. सोपो वसुलीतील ४६ लाखांचा घपला, पे पार्किंगचा १0 लाखांचा घोटाळा आणि रिलायन्स फोर जी केबल प्रकरणी ३२ लाखांचा घोटाळा गेले काही दिवस गाजत आहे. या घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्यांना निलंबित करुन पोलिस तक्रार करावी आणि प्रकरणे लोकायुक्तांकडे सोपवावी, अशी मागणी संतप्त नगरसेवकांनी सोमवारी विशेष बैठकीत केली होती त्यावर आयुक्त दीपक देसाई यांनी चार दिवसात कारवाईचे आश्वासन दिले होते. या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.