शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री

By admin | Updated: May 7, 2015 00:35 IST

यांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...

लक्ष्मीकांत पार्सेकरयांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.पणजी : २०१७ सालची निवडणूक ही निश्चितच भाजपकडून आपल्या नेतृत्वाखाली लढविली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरयांनी खास ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केला. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलाखत...ॅ या पुढील म्हणजे २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला किती जागा मिळतील व त्या निवडणुका कुणाच्या नेतृत्वाखाली लढविल्या जातील?- माझ्या पक्षाने मला विश्वासाने मुख्यमंत्रिपद दिले आहे. मी मुख्यमंत्री असल्याने २०१७ची निवडणूक भाजप माझ्याच नेतृत्वाखाली लढवील. भाजपने माझ्याच नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरे जावे, असा आग्रहही मी पक्षाकडे धरीन. २०१२ साली आम्हाला २१ जागा मिळाल्या. २०१७ साली मी भाजपला निश्चितच २६ ते २७ जागा मिळवून देईन. मला तेवढा विश्वास आहे. आमचे लक्ष्य ३१ जागा मिळविण्याचे असेल. मगो किंवा अन्य कोणता पक्ष त्या वेळी आमच्यासोबत असेल की नाही, यावर मी भाष्य करत नाही; पण पुढील अडीच वर्षांत आयटी प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक सिटी, गुंतवणूक मंडळासमोर येणारे प्रस्ताव अशा मार्गांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मी अडीच वर्षांत भरीव काम करून दाखवीन. अलीकडेच आम्ही ३८ प्रकल्प मंजूर केले. त्यातून सहा हजार रोजगार संधी निर्माण होतील. केंद्र सरकारच्याही अत्यंत चांगल्या विमा व अन्य योजना येत आहेत. भाजपला २०१२ सालापेक्षाही २०१७ साली जास्त जागा मी मिळवून देईन. त्यासाठी रक्ताचे पाणी करीन.ॅ गेल्या सहा महिन्यांत तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकहितासाठी काय केले?- २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ती निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली नव्हती. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भाजप लढला होता. मी त्या वेळी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. भाजपला बहुमत मिळाले, तर पर्रीकर सीएम बनतील, असे त्या वेळी पक्षाने अगोदरच ठरविले होते. पर्रीकर यांना केंद्रात जावे लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडे मुख्यमंत्रिपद आले. कोणतेही लॉबिंग न करता किंवा दिल्लीत जाऊन कुणाकडे मुख्यमंत्रिपद न मागता माझ्याकडे पक्षाने मोठ्या विश्वासाने व जबाबदारीने हे पद सोपविले. भाजपने निवडणुकीवेळी जाहीरनाम्यातून जी आश्वासने दिली होती, त्यापैकी काही आश्वासने अडीच वर्षांच्या कालावधीत पर्रीकर सरकारने मार्गी लावली. उर्वरित ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या, त्या पुढे नेणे हे माझे काम आहे. गेल्या अर्थसंकल्पातून मी पूर्वीच्या काही योजनांमध्ये सुधारणा केल्या. काही घोषणा व योजनांना नव्या गोष्टी जोडल्या. माझ्या पक्षाने जनतेला निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने मी पूर्णत्वास नेत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांशी माझ्या बैठकाही होत आहेत.