शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मडकईत अपघातानंतर उद्रेक

By admin | Updated: July 1, 2015 00:52 IST

फोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा,

फोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा, अशी मागणी लावून धरून संतप्त नागरिकांनी तब्बल पाच तास रास्तारोको केला. म्हार्दोळ जंक्शन येथील महामार्गही संतप्त नागरिकांनी अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक, तसेच प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या आश्वासनानंतर जमावाने मृतदेह हलवण्यास परवानगी दिली. या गोंधळात सव्वादहाच्या सुमारास गतप्राण झालेल्या गोकुळदास नाईक गुरव यांच्या मृतदेहाची सुमारे पाच तास परवड झाली. दरम्यान, पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली.कानेऱ्या-मडकई (कायतान बारजवळ) येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. मृताचे नाव गोकुळदास नाईक गुरव (वय ५५, रा. प्रियोळ) असे आहे. सकाळी सव्वादहाच्या सुमारास गोकुळदास नाईक मुळवी हे आपल्या जीए ०५-ई ९२१३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मडकईमार्गे वास्कोला निघाले होते. ते नौदलात नोकरीला होते. कानेऱ्या-मडकई येथील चढणीवर ते पोहोचले असता मडकई औद्योगिक वसाहतीतून दगड घेऊन खाली येत असलेल्या जीए ०८-यू ००८४ या ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी ट्रकचालकाला अटक करून घटनास्थळी आणण्याची मागणी केली. अपघाताचे वृत्त कळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, तसेच उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, गौतम शेटकर, अक्षय पार्सेकर, मार्लन डिकॉस्ता, पांडुरंग गावडे, रामचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त जमावाने मृतदेह हलविण्यास हरकत घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक बेकायदेशीरपणे दगड वाहतूक करीत असल्याचा दावा करून स्थानिकांनी ट्रकची समोरील चाके पंक्चर केली. कोणत्याही परिस्थितीमडकईत अपघातानंतर उद्रेकफोंडा : दगडवाहू ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याने मडकईत लोक प्रक्षोभक बनले. घटनास्थळाहून पलायन केलेल्या ट्रकचालकाला अटक करा, अशी मागणी लावून धरून संतप्त नागरिकांनी तब्बल पाच तास रास्तारोको केला. म्हार्दोळ जंक्शन येथील महामार्गही संतप्त नागरिकांनी अडवून ठेवल्याने वाहतूक कोंडी झाली. दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक, तसेच प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या आश्वासनानंतर जमावाने मृतदेह हलवण्यास परवानगी दिली. या गोंधळात सव्वादहाच्या सुमारास गतप्राण झालेल्या गोकुळदास नाईक गुरव यांच्या मृतदेहाची सुमारे पाच तास परवड झाली. दरम्यान, पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या ट्रकचालकाला अटक करण्यात आली.कानेऱ्या-मडकई (कायतान बारजवळ) येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. मृताचे नाव गोकुळदास नाईक गुरव (वय ५५, रा. प्रियोळ) असे आहे. सकाळी सव्वादहाच्या सुमारास गोकुळदास नाईक मुळवी हे आपल्या जीए ०५-ई ९२१३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मडकईमार्गे वास्कोला निघाले होते. ते नौदलात नोकरीला होते. कानेऱ्या-मडकई येथील चढणीवर ते पोहोचले असता मडकई औद्योगिक वसाहतीतून दगड घेऊन खाली येत असलेल्या जीए ०८-यू ००८४ या ट्रकची त्यांना जोरदार धडक बसली. ते दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी ट्रकचालकाला अटक करून घटनास्थळी आणण्याची मागणी केली. अपघाताचे वृत्त कळताच फोंड्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, तसेच उपनिरीक्षक हरिश वायंगणकर, गौतम शेटकर, अक्षय पार्सेकर, मार्लन डिकॉस्ता, पांडुरंग गावडे, रामचंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त जमावाने मृतदेह हलविण्यास हरकत घेतली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक बेकायदेशीरपणे दगड वाहतूक करीत असल्याचा दावा करून स्थानिकांनी ट्रकची समोरील चाके पंक्चर केली. कोणत्याही परिस्थितीत ट्रकचालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.मडकईत वातावरण तापलेले असतानाच म्हार्दोळ येथील जंक्शनवर सुमारे दीडशे-दोनशे नागरिकांनी महामार्ग अडविल्याने कोंडी झाली. (पान ९ वर)त ट्रकचालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली.मडकईत वातावरण तापलेले असतानाच म्हार्दोळ येथील जंक्शनवर सुमारे दीडशे-दोनशे नागरिकांनी महामार्ग अडविल्याने कोंडी झाली. (पान ९ वर)