शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवरील निर्बंध कार्यशून्यता लपविण्यासाठीच, गोसुमचे सरकारला ५ प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:55 IST

आपली कार्यशून्यता आणि घोटाळे लपविण्यासाठी पत्रकारितेचे पंख छाटण्याचे काम सरकारकडून सुरू असून पत्रकारांना

पणजी -  आपली कार्यशून्यता आणि घोटाळे लपविण्यासाठी पत्रकारितेचे पंख छाटण्याचे काम सरकारकडून सुरू असून पत्रकारांना विधानसभेत प्रवेशबंदी करण्यासाठी विधिमंडळाकडून नव्याने तयार करण्यात आलेले नियम हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचा आरोप गोवा सुरक्षा मंचाने केला आहे.  

लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असलेल्या पत्रकारितेलाच उपटून फेकून देण्याचा हा डाव असल्याचे मंचाचे अध्यक्ष आनंद  शिरोडकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले ‘नियम बनविताना गोव्यातील बहुतांष वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना विधानसभेत प्रवेश मिळणार नाही याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच एक तर सरकारच्या विरोधात लिहू नका किंवा विधानसेत येवू नका अशी अप्रत्यक्षरित्या धमकीच दिली गेली आहे. सरकारचे अपयश व घोटाळे उघडे होतील म्हणून हे निर्बंधआणले जात आहेत. हा पूर्णपणे घटनाविरोधी निर्णय आहे. सुदृढ लोकशाहीसाठी सरकारचा प्रभाव व विधिमंडळावर असता कामा नये. गोव्यात दुर्दैवाने तो प्रभाव जाणवत आहे. पत्रकारितेचे मूल्यमापन करताना वृत्तपत्राचा खप आणि मिळणारा नफा हे निकश लावण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रस्तुत नियमावलीच्या मुद्यावरून मंचाने विधिमंडळाला ५ प्रश्न केले आहेत.   लहान वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, नियतकालिके ही माद्यमे नाहीत काय?  लोकशाहीचे आधारस्तंभ ठरलेल्या वृत्तपत्रांचा अवाका लहान झाला म्हणून त्यांचे योगदान नाकारण्याचा अधिकार विधिमंडळाला आहे काय?  हे योगदान त्या वृत्तपत्राला होणाºया नफा व तोट्याचा निकश लावून ठरविणारे विधीमंडळ कोण? माहिती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे नियम घटना विरोधी आहेत याची कल्पना आहेत काय? आॅनलाईन व्यवहाराचे ढोल बडविणारे इलेक्ट्रॉनिक न्यूज माध्यमाच्या जीवावर का उठले आहेत?