शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

मडगावच्या नगराध्यक्षांचे बांधकाम पाडण्याचा आदेश

By admin | Updated: March 24, 2015 01:15 IST

मडगाव : मडगावचे नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांचे मुंगूल येथे असलेले वादग्रस्त बेकायदेशीर बांधकाम शेवटी त्वरित पाडण्याचा

मडगाव : मडगावचे नगराध्यक्ष गोंझाक रिबेलो यांचे मुंगूल येथे असलेले वादग्रस्त बेकायदेशीर बांधकाम शेवटी त्वरित पाडण्याचा आदेश मडगावचे मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी दिला आहे. यामुळे आता मडगाव पालिकेत नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी, असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ज्या जागेत हे बांधकाम आहे ती जागा २0१३ मध्ये बिल्डरने मडगाव नगरपालिकेच्या नावे दान केली आहे. त्यामुळे ही नगरपालिकेची मालमत्ता असल्याचे सिध्द झाले आहे. हे बांधकाम नगरपालिकेच्या जागेत असल्याने ते विनाविलंब मोडणे योग्य ठरेल, असा अभिप्राय देणारा आदेश मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांनी सोमवारी सायंकाळी दिला. दरम्यान, हा आदेश दिल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मडगाव पालिकेत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा पोलीस बंदोबस्त पाहून नगराध्यक्ष रिबेलो यांनी आम्ही बिहारात तर नाहीत ना असे आपल्याला वाटले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माडेल-मडगाव येथील नागरिक व पत्रकार सावियो डायस यांनी रिबेलो यांच्या या बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती. या बांधकामाचा बार म्हणून वापर केला जायचा. हे बांधकाम नगराध्यक्ष रिबेलो यांचे वडील ज्युलियो रिबेलो यांच्या मालकीचे असून नगराध्यक्ष रिबेलो यांच्याकडे या दुकानाचा ताबा असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. या बांधकामाच्या मागे असलेल्या रिबेलो यांच्या घराच्या जागेत एका बिल्डरने इमारत उभी केली असून त्या वेळी बार असलेली ही जागा नगरपालिकेच्या नावे दान केली होती. ही जागा रस्ता रुंदीकरणासाठी सोडली होती असे असतानाही नगरसेवक असलेले रिबेलो यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हे बेकायदेशीर बांधकाम कायम ठेवले, असा डायस यांचा दावा होता. मडगाव मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या या तक्रारीची सुरुवातीला दखल न घेतल्याने डायस यांनी नगरपालिका प्रशासन संचालकाकडे दाद मागितली होती. या तक्रारीवर एका महिन्यात काय तो निर्णय घ्यावा, असे नमूद करून ही फाईल पुन्हा मडगाव पालिकेकडे पाठविण्यात आली होती. (प्रतिनिधी)