शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2023 18:28 IST

गाेवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात खूप संधी आहे.

नारायण गावस, पणजी : पर्यटन हे गोव्याचे सर्वात माेठ आर्थिक बळ देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात राेजगाराच्या संधी माेठ्या आहेत. येत्या २ ते ३ वर्षात पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्या तयार होऊ शकतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा व पर्यटन खात्याचे अधिकारी व या क्षेत्रातील अन्य भागधारक उपस्थित होतेगोव्यात प्रत्येकाने सरकारी नाेकरीच्या मागे लागू नये. जर आपल्याकडे कला कौशल्य तसेच काम करण्याची इच्छा असेल तर कुठेही काम मिळू शकते. गाेवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात खूप संधी आहे. या संधीचा लाभ बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.

सरकारने मागील २ वर्षात अनेक विकासकामे केली आहे. मनाेहर आंतराष्ट्रीय विमानतळ त्याचाचा एक भाग आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र वाढत आहे. आता पुढच्या महिन्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. यामुळे देश विदेशातील पर्यटक येणार आहेत. जी २० परिषदेमुळे अनेक प्रतिनिधी गाेव्यात आले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले- सरकार पर्यटन क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण काहीजण याचे राजकारण करत आहेत. सरकार गोवेकरांचा धंदा काढून दिल्लीकरांना देत आहे, असा आरोप करत आहेत. पण, असा आरोप करणाऱ्या लोकांनीच दिल्लीकरांना स्वतःच्या जमिनी विकून टाकले आहेत, असे आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे.- पर्यटन क्षेत्रात नवीन बदल आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर आहे. पण त्याला प्रत्येकवेळी विरोध करण्यात येतो. टॅक्सीचालकांसाठी टॅक्सी ॲप आणला यालाही विराेध झाला. यामध्येही राजकारण आणत आहेत. सरकार गोवेकरांचा धंदा काढून दिल्लीकरांना देत नाही प्रथम प्राधान्य हे स्थानिकांना दिले जात आहे. काही लोक सरकारवर विनाकारण अरोप करत आहे. असा आरोप करणाऱ्या लोकांनीच दिल्लीकरांना आपल्या जमिनी विकून टाकल्या आहेत, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

पर्यटन खाते समुद्र किनाऱ्याच्या पलीकडीच्या पर्यटनावर भर देत आहे.. यात ग्रामीण, पर्यावरण, जंगल, अध्यात्म, आरोग्य अशा विविध क्षेत्रांचा समावेश केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे विकासाचे ध्येय गाठण्यासही मदत होते, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटनPramod Sawantप्रमोद सावंत