शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मराठी अकादमीचे मंगळवारी उद्घाटन

By admin | Updated: May 21, 2016 03:37 IST

पणजी : गोवा सरकारी मराठी अकादमी ही सर्वसमावेशक आणि मराठी संस्कृती जपण्यासाठीची चळवळ ठरेल, असे अकादमीचे

पणजी : गोवा सरकारी मराठी अकादमी ही सर्वसमावेशक आणि मराठी संस्कृती जपण्यासाठीची चळवळ ठरेल, असे अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी सांगितले. मंगळवर, २४ रोजी नवीन मराठी अकादमीचे उद्घाटन कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. अनिल सामंत म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा भाषिक द्वेष नसलेली, सर्व भारतीय भाषांचा सन्मान करणारी आणि त्याचवेळी मराठीसाठी वाहून घेतलेली संस्था, असे स्वरू प मराठी अकादमीचे आहे. अकादमीच्या घटनेतच तशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातही अकादमीच्या मूल्यांचा ढाचा कायम राहून ती दिशा भरकटणार नाही, अशी व्यवस्था आहे. ‘मैत्र जिवांचे’ हे नवीन अकादमीचे घोषवाक्य असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्यात ९ मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. प्राचार्य गोपाळराव मयेकर, प्रसाद सावकार, पं. सोमनाथबुवा च्यारी, रामकृष्ण नायक, रमाकांत पायाजी, पु. शि. नार्वेकर, भिकू पै आंगले, जयराम कामत आणि ह. भ. प. नारायणबुवा बर्वे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला ‘मराठी ऊर्जा गीते’ हा कार्यक्रम होणार असून त्यात डॉ. प्रवीण गावकर, अक्षय नाईक आणि ऋतिष्का वेर्णेकर या कलाकारांचे गायन होणार आहे. २४ मे रोजी कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)