शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस आल्यानंतरच योग्य तो निर्णय घेऊ

By admin | Updated: April 1, 2017 02:12 IST

मडगाव : लुईस बर्जर लाच प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार चर्चिल

मडगाव : लुईस बर्जर लाच प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांच्या मालमत्तेवर एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडून टाच आल्याने सध्या सासष्टीत हा चर्चेचा विषय बनलेला असताना दोन्ही नेत्यांनी अजूनही आम्हाला याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही त्यासंदर्भात काहीच बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.दिगंबर कामत यांनी शुक्रवारी पाणी खात्याच्या अभियंत्यांबरोबर बैठक घेतली होती. या वेळी पत्रकारांनी त्यांना या कारवाईबद्दल विचारले असता, मला अजूनही ईडीकडून कुठलीही नोटीस आलेली नाही. मी फक्त ही बातमी वृत्तपत्रांतून वाचली आहे. जोपर्यंत नोटीस येत नाही, तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणे शक्य नाही. अशी नोटीस आलीच तर माझे वकील त्याला उत्तर देतील, असे ते म्हणाले. दरम्यान, ही कारवाई म्हणजे राजकारणाचाच एक भाग असल्याची प्रतिक्रिया कामत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कामत यांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचा जाणूनबुजून केलेला हा प्रयत्न, अशा प्रतिक्रिया या समर्थकांकडून व्यक्त होत आहेत.बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही या कारवाईबद्दल मला अजिबात माहिती नाही, असे सांगताना ज्या फ्लॅटबद्दल बोलले जात आहे ते फ्लॅट मला व माझ्या कुटुंबीयांना एका बिल्डरने पूर्वजांच्या जमिनीच्या व्यवहारात दिले होते, असे ते म्हणाले. यासंदर्भात आलेमाव यांना विचारले असता, अजूनपर्यंत मलाही ईडीकडून नोटीस आलेली नाही. ही नोटीस आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)