शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब कोसळून एक जागीच ठार तर दोन गंभीर जखमी

By पंकज शेट्ये | Updated: September 7, 2023 17:32 IST

वरुणापूरी, वास्को येथील नौदलाच्या वसाहतीत घडली घटना

वास्को: भारतीय नौदलाच्या वरुणापूरी, वास्को येथील ‘नेवल टेक्नीकल युनिट’ मधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तेथे कामाला असलेला एक कामगार जागीच ठार झाला तर दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. स्लॅब कोसळल्याने जागीच ठार झालेल्या कामगाराचे नाव खेमकांत नारायण नाईक (वय ५०) असे असून तो मडकई येथील रहीवाशी आहे. स्लॅब कोसळल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या साई महाले (काणकोण) आणि बाबासाहेब सांगले ह्या दोन्ही कामगारांना बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

वास्को पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.७) सकाळी १०.३० च्या सुमारास ती घटना घडली. वरुणापूरी, वास्को येथे असलेल्या नौदल वसाहतीतील नेवल टेक्नीकल युनीटमधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब अचानक खाली कोसळला. ज्यावेळी तो स्लॅब कोसळला तेव्हा तेथे ‘नेवल सीवीलीयन एंप्लोई’ चे काही कामगार काम करत होते अशी माहीती प्राप्त झाली. त्या स्लॅबचा काही मोठा भाग खेमकांत नाईक याच्यावर कोसळल्याने तो जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली. तसेच स्लॅबचा काही भाग साई महाले याच्यावर कोसळल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या तर बाबासाहेब सांगले याच्या डोक्याला स्लॅब कोसळल्याने गंभीर जखमा झाल्याची माहीती प्राप्त झाली. स्लॅब कोसळून त्यात तिघेजण गंभीररित्या जखमी झाल्याचे तेथे असलेल्या नौदल कर्मचाऱ्यांना दिसून येताच त्यांनी तिघांनाही त्वरित उपचारासाठी नौदलाच्या जिवंती इस्पितळात नेले. मात्र इस्पितळात आणण्यापूर्वीच खेमकांत नाईक याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याघटनेत जखमी झालेल्या साई आणि बाबासाहेब यांना नंतर पुढच्या उपचारासाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवण्यात आले.

घटनेची माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. तसेच स्लॅब कोसळून मरण पोचलेल्या खेमकांत नाईक याचा मृतदेह मडगावच्या हॉस्पीसीयो इस्पितळाच्या शवगृहात पाठवल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर अधिक तपास करित आहेत.