शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

एक जूनची डेडलाईन!

By admin | Updated: May 29, 2016 02:00 IST

कुडचडे : जून महिन्यापासून गोव्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले सरकारी अनुदान बंद करा; अन्यथा घरी बसण्याची तयारी ठेवा,

कुडचडे : जून महिन्यापासून गोव्यातील इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले सरकारी अनुदान बंद करा; अन्यथा घरी बसण्याची तयारी ठेवा, असा थेट इशारा भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी शनिवारच्या कुडचडे येथील सभेत राज्य सरकारला दिला. भाषा समर्थकांचा बालेकिल्ला असलेल्या कुडचडेतील सभेलाही प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. विशेष म्हणजे माजी आमदार रामराव देसाई व श्याम सातार्डेकर यांनीही उपस्थिती लावून पाठिंबा व्यक्त केला. स्थानिक नगरसेविका अपर्णा प्रभूदेसाई व दाभाळचे सरपंच दीपक पाऊसकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी केलेल्या जोशपूर्ण भाषणात वेलिंगकर म्हणाले, मातृभाषेशी द्रोह करणे म्हणजे प्रत्यक्ष आईशी द्रोह करणे. असे लोक सिद्धांतहीन असतात. भाजपनेही मातृभाषेशी द्रोह करून आपला तत्त्वहीनपणा दाखवून दिला आहे. अशा वृत्तीच्या या विषवल्लीला मुळापासून उखडून टाकायची वेळ आली आहे. मतदारांना पर्याय नाही, या भ्रमात राहू नका. जनता लाचार नाही. ते तुम्हाला योग्य तो धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले की, भाजपला वाटते की, मतदारांना पर्याय नसल्यामुळे कुठलाही निर्णय घेतला, तरी आपल्याला कुणी हात लावू शकणार नाही. योजनांचे काही पैसे टाकले म्हणून जनता लाचार होईल, असे भाजप आमदारांना वाटत असेल, तर ती त्यांची घोडचूक आहे. जनता सरकारात काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळे स्वाभिमानी जनतेने अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ऋषीतुल्य नेत्यांनाही घरी बसविले होते. त्यापुढे गोव्यातील भाजप आमदारांची पात्रता काय? गेल्या चार वर्षांत भाजपच्या सर्व २१ आमदारांनी लोकांशी प्रतारणा केली. जर त्यांना आपल्या पापांचे क्षालन करायचे असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन भाजपातून बाहेर पडावे आणि जनआंदोलनात सामील व्हावे. २ आॅक्टोबरला आम्ही (पान ४ वर)