शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मॅनेजमेंटमधील विनयभंग प्रकरणात त्या अद्यापकाची एक तास चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:53 IST

विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या प्रकरणातील संशयित पर्वरी येथील गोवा हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे ज्येष्ठ व्याख्याते पंकज कुमार सिंग याची पणजी महिला पोलीस स्थानकात सोमवारी एक तास चौकशी केली.

पणजी: विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या प्रकरणातील संशयित पर्वरी येथील गोवा हॉटेल मॅनेजमेंट संस्थेचे ज्येष्ठ व्याख्याते पंकज कुमार सिंग याची पणजी महिला पोलीस स्थानकात सोमवारी एक तास चौकशी केली. या प्रकरणात त्याला पुन्हा चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.सोमवारी सकाळी पंकज कुमारसिंग हे महिला पोलिसस्थानकात आले.महिला पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक यांनी त्याची चौकशी केली. त्याला विचारण्यात अलेल्या बऱ्याच प्रश्नांवर त्याला समाधानकारक उत्तरे देता आले नाहीत. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्याच्या अटकेची शक्यताही नाकारता येत नाही. संशयित पंकज कुमार याला पोलीस स्थानकात १२ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स ५ नोव्हेंबर रोजी बजावण्यात आला होता.हॉटेल मेनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थ्यांनिने या अद्यापकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पणजी महिला पोलीस स्थानकात नोंदविली होती.अत्यंत असभ्य शब्दात शेरे मारून युवतीचा मानसिक छळ करण्यापासून इतर प्रकारचे लैंगिक छळही संशयिताने चालविले होते असे विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशखा समितीकडे हे प्रकरण नेण्यात आले होते. परंत या समितीने तपासात काहीच प्रगती दाखविली नसल्यामुळे पुन्हा तपास करण्याची मागणीही पिडीत विद्यार्थिनीने केली होती. या तक्रारीला अनुसरून महिला पोलीससांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम ५०९, ३५४ (अ) आणि ३५४ अंतर्गत विनयभंग, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला होता.