शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कला अकादमीच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत कामकाज रोखून धरले

By वासुदेव.पागी | Updated: July 18, 2023 12:15 IST

पहिल्याच दिवशी पहिल्या तासाला गदारोळ, कामकाज अर्धातास तहकूब

पणजी- विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी कला अकादमीचे बांधकाम कोसळण्याच्या मुद्द्यावरून आणि नूतनीकरणाच्या कथित घोटाळ्याच्या मुद्यावरून कामकाज रोखून धरले.

विरोधक भ्रष्टाचार विरोधी घोषणाचे फलकच घेऊन आले होते. सभापती सभागृहात येऊन राष्ट्रगीत झाल्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमावयांनी उभे राहून कला अकादमीच्या बांधकामाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणावर अर्धा तास चर्चा घेण्याची मागणी केली. या मागणीची सभापतीकडे आग्रह धरताना युरी आलेमाव, विजय सरदेसाई, एल्टन डिकॉस्टा, कार्लुसफारेया, वेन्जी विएगश, क्रूज सिल्वा,आणि विरेश बोरकर यांनी सभापतीच्या पटलाकडे धाव घेतली.सभापती रमेश तवडकर यांनी त्यांना प्रश्नोत्तराचे कामकाज संपल्यावर चर्चा करू या असे सांगितले.

मुख्यमंत्री. डॉ प्रमोद  सावंत यांनीही  नंतर  या विषयावर ते निवेदन करणार असल्याचे सांगितले.  मात्र विरोधक आपल्या चर्चेच्या  मागणीवर ठाम राहिले.  पाउणेबारा वाजेपर्यंतचे  कामकाज रोखून धरले.  त्यानंतरही विरोधकांनी कामकाज चालू न  दिल्यामुळे  सभापतींनी अर्धा तास कामकाज तहकूबकेल्याचे जाहीर केले.

एल्टनची वेगळी भुमिका

पहिल्याच दिवशी विरोधक आपले अस्तित्व व ताकद दाखवून देण्यासाठीकला अकादमीच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ करणार हे अपेक्षितहोते. मात्र  त्यातही रणनीतीच्या बाबतीत ते गोंधळल्याचे दिसले. कारणएकीकडे चर्चेची मागणी करून विरोधक कामकाज रोखून धरत होते तरदुसरीकडे कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता हे सभापतींनी त्यांचे प्रश्नविचारण्यासाठीनाव पुकारल्यावर एल्टन आपल्या जागेवर जाऊन प्रश्नविचारू लागले. त्यांनाही विरोधकांनी प्रश्न विचारू दिला नाही ही गोष्टवेगळी, परंतु विरोधकांकडे ठोस रणनीती आणि ऐक्याचा अभाव मात्रयामुळे दिसुन आला.