शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी अध्यादेश नाही, अवलंबितांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 19:06 IST

राज्यातील खनिज खाणी लवकर सुरू होणार नाहीत हे गुरूवारी अधिक स्पष्ट झाले.

पणजी : राज्यातील खनिज खाणी लवकर सुरू होणार नाहीत हे गुरूवारी अधिक स्पष्ट झाले. केंद्रीय खाण कायदा दुरुस्त करणारा अध्यादेश जारी केला जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय खनिज मंत्रलयाने घेतली असल्याचे वृत्त दिल्लीहून एका प्रतिष्ठीत राष्ट्रीय दैनिकाच्या संकेतस्थळावरून प्रसृत झाल्यानंतर गोव्यातील खाण क्षेत्रत व खाण अवलंबितांमध्ये आणि राजकीय पक्षांतही खळबळ उडाली. सरकारने सारवासारव सुरू केली पण खाण अवलंबितांचे नेते पुती गावकर व इतरांनी खाणप्रश्नी स्पष्टता यावी अशी मागणी केली. स्पष्टता येणार नसेल तर गोवा फॉरवर्ड व मगोपने सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.खनिज खाणींच्या विषयावर सरकार उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे तर मगो पक्षाचे नेते दिपक ढवळीकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी नेले जावे, अशी मागणी केली आहे. एमएमडीआर कायदा दुरुस्त करण्यासाठी अध्यादेश (वटहुकूम) जारी करा व गोव्याच्या खाणी लवकर सुरू करा, अशी मागणी खाण अवलंबित आंदोलकांनी सातत्याने केली. मंत्री निलेश काब्राल, विजय सरदेसाई तसेच अन्य नेत्यांनीही अध्यादेशाची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकार अध्यादेश जारी करण्याच्या घाईत नाही हे स्पष्ट झाले आहे. अध्यादेश येणार नाही याची कल्पना भाजपच्या एका गटालाही व काही खासदारांनाही होती व आहे. तथापि, गोव्याच्या खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक सादर करील, असा विश्वास भाजपचे काही नेते व मंत्री काब्राल आता व्यक्त करू लागले आहेत. खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही असे खाण अवलंबितांना वाटू लागले आहे पण केंद्र सरकार गंभीर आहे, असे मंत्री काब्राल यांचे म्हणणो आहे.दरम्यान, गोव्याच्या खाणी लवकर सुरू व्हाव्यात म्हणून विविध पर्याय पडताळून पाहण्याच्या हेतूने मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गुरुवारी वरिष्ठ सरकारी अधिका:यांची बैठक घेतली, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.