शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मटक्याचा छडा लावता की नाही?

By admin | Updated: April 10, 2017 03:42 IST

‘मटका जुगाराचा छडा लावता की नाही ते स्पष्टपणे सांगा,’ अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी

पणजी : ‘मटका जुगाराचा छडा लावता की नाही ते स्पष्टपणे सांगा,’ अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने गोवा पोलिसांना शुक्रवारी सुनावले. मटका प्रकरणाचा दोन आठवड्यांत छडा लावला नाही तर न्यायालयाकडून विशेष पथक नियुक्त करण्याचा विचारही केला जाऊ शकतो, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. मटक्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश निघत असतानाही गोवा पोलीस जुगार बंद करण्यासाठी ठोस पावले उचलत नसल्यामुळे खंडपीठाने त्याची दखल घेतली. पोलिसांना हे जमत नसेल तर जमत नाही म्हणून सांगा. आम्ही पाहून घेतो, असे न्यायमूर्ती एफ. एम. रेईश आणि नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने सुनावले. न्यायालयाच्या सूचनेनंतर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी विशेष बैठक होऊन त्यावर चर्चाही झाली. हे प्रकरण हाताळणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाला विशेष सूचना दिल्या आहेत. मुख्यालयाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. माहिती हक्क कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी मटक्याविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर अनेकवेळा सुनावणी झाली. प्रत्येकवेळी खंडपीठाने पोलिसांना मटका प्रकरणाचा छडा लावण्याची सूचना केली होती. तसेच मटका क्रमांक प्रसिद्ध करणाऱ्या गोव्यातील दैनिक तरुण भारत आणि दैनिक पुढारी या दोन वृत्तपत्रांनाही नोटिसा बजावल्या होत्या. या वृत्तपत्रांकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे मटका क्रमांक प्रसिद्ध करणे या वृत्तपत्रांना बंद करावे लागले होते. या वृत्तपत्रांकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून त्याची माहिती दिली होती. गुन्हा अन्वेषण विभागानेही या दोन्ही वृत्तपत्रांना नोटिसा बजावून चौकशी केली होती आणि पदाधिकाऱ्यांना चौकशीला बोलावून जबाब नोंदवून घेतला होता. पोलीस मटका जुगारावर कारवाई करीत नाहीत; कारण पोलिसांच्याच आशीर्वादाने मटका जुगार सुरू आहे आणि त्यांना काही वृत्तपत्रांची साथ आहे, असा दावा शेट्ये यांनी याचिकेत केला आहे. परंतु तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस किंवा पत्रकार यांचा मटका जुगाराशी काही संबंध असल्याचे पुरावे आढळले नसल्याचे म्हटले होते. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचीही मागणी याचिकादाराने केली होती. (प्रतिनिधी)