शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवे महामार्ग नको

By admin | Updated: March 5, 2017 02:28 IST

पणजी : महामार्गांच्या बाजूचे बार आणि दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जर आला नसता तर आम्ही

पणजी : महामार्गांच्या बाजूचे बार आणि दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जर आला नसता तर आम्ही गोव्यात आणखी नव्या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्र्मितीला आक्षेप घेतला नसता. गेल्या दोन जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या महामार्ग मंत्रालयाने जारी केलेली अधिसूचना मागे घेण्याची विनंती आम्ही केंद्र सरकारला करू; कारण आम्हाला आणखी बार आणि दारू दुकाने अडचणीत आणायची नाहीत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी ‘लोकमत’ला सांगितले.ते म्हणाले, गोव्यातील आणखी २९९ किलोमीटरच्या रस्त्यांचे केंद्राने राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतरण केले आहे. तसे तत्त्वत: केंद्राने ठरविल्याचे गोवा सरकारला कळविलेही आहे. गोवा सरकारने यापूर्वी यास आक्षेप घेतला नव्हता. मात्र, आणखी २९९ किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग बनल्यास या महामार्गांच्या बाजूचे आणखी हजारो बार आणि दारू दुकाने अडचणीत येतील याची कल्पना गोवा सरकारला आली आहे.ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचा संबंधित आदेश ज्या वेळी आला नव्हता, त्या वेळी राज्य सरकारने काही मार्गांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गांमध्ये करण्यास मान्यता दिली होती; पण आता स्थिती बदललेली आहे. महामार्गांपासून पाचशे मीटरमध्ये दारू दुकाने असू नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने गोव्याला आणखी नवे राष्ट्रीय महामार्ग नको अशी भूमिका आम्ही घेऊ. शेवटी राज्याच्या हितास आम्ही प्रथम प्राधान्य देऊ.ते म्हणाले, की केंद्र सरकारकडे आम्ही भारतमाला व सागरमाला या दोन प्रकल्पांचा पाठपुरावा करत आहोत. या दोन प्रकल्पांवर केंद्र सरकार गोव्यात सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करणार आहे. या दोन्ही प्रकल्पांतर्गत किनारपट्टीत तसेच पर्यटनस्थळांना आणि धार्मिकस्थळांना जोडणारे रस्ते होतील. त्यामुळेच गोव्यातील काही रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यास आम्ही तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र, आम्ही केंद्राला अधिसूचना मागे घेण्याची विनंती करू.(खास प्रतिनिधी)