शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पारवडेश्वर महाराजांचे निर्वाण

By admin | Updated: June 23, 2015 01:21 IST

फोंडा : भारताच्या आधुनिक संतपरंपरेतले संत, समाजसुधारक, अध्यात्माचे उपदेशक तसेच लाखो लोकांना हितबोध करून त्यांना दिशा देणारे योगीराज

फोंडा : भारताच्या आधुनिक संतपरंपरेतले संत, समाजसुधारक, अध्यात्माचे उपदेशक तसेच लाखो लोकांना हितबोध करून त्यांना दिशा देणारे योगीराज श्री पारवडेश्वर महाराजांचे (वय ४७) सोमवारी सकाळी ११.३0 वाजता महानिर्वाण झाले. किरकोळ आजाराने त्रस्त असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पारवडेश्वर महाराजांचे पार्थिव तळेखोल-बेतोडा येथील गायत्री पीठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून मंगळवार दि. २३ रोजी दुपारी ३ वाजता समाधी विधी पार पाडला जाईल.पारवडेश्वर महाराजांनी गोवा-कर्नाटक सीमेवरील पारवड गावात अवतीर्ण होऊन समाजसुधाराचे व आध्यात्मिक उपदेशाचे कार्य प्रारंभ केले. तेव्हापासून अखेरच्या क्षणापर्यंत ते अव्याहतपणे लोकसेवेचे, दीनोद्धाराचे व सामाजिक सेवेचे कार्य करीत आले असून, संपूर्ण जगभर महाराजांनी सुमारे २८५ समाजसेवेचे मठ स्थापन केले आहेत. केवळ गोमंतकच नव्हे, तर संपूर्ण जगभर महाराजांचा शिष्यगण विखुरलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांना ‘जागतिक शांतिदूत’ ही उपाधी दिली होती.महाराजांनी लाखो लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे संसार पुन्हा मार्गी लावले आहेत. सामाजिक एकता अबाधित राखण्यासाठी त्यांनी सर्वधर्म संमेलनाचे आयोजन केले. गेली २५ वर्षे हे संमेलन नियमित सुरू आहे. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख अशा सर्व धर्मांचे धर्मगुरू एकाच व्यासपीठावर येऊन विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात. कुटुंबात शांती असेल तरच समाजात शांती नांदेल, हे सूत्र मानणाऱ्या महाराजांनी कुटुंबात शांती नांदावी, यासाठी दाम्पत्य आशीर्वचन सोहळे आयोजित केले. (पान ८ वर)