शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 08:23 IST

नव्या आणि जुन्या अशा सर्वच मतदारांबाबत हा प्रकार घडला आहे. मतदारांचा मनःस्ताप वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : निवडणूक आयोगाने इंग्रजी भाषेतील मतदार याद्यांतील नावे देवनागरीत लिपीत रुपांतरीत केली आहेत. मात्र भाषांतराच्या या प्रक्रियेत अनेक चुका घडल्याने याद्यांमध्ये घोळ निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या चुकांचे परिणाम मतदारांना सहन करावा लागणार आहे. जर या चुकांची दुरुस्ती वेळीच न झाल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे मतदारांचा मनःस्ताप वाढला आहे.

नव्या आणि जुन्या अशा सर्वच मतदारांबाबत हा प्रकार घडला आहे. काही घरांत दोनपेक्षा जास्त मतदार असलेल्या ठिकाणी एक नाव व्यवस्थित असले तरी दुसऱ्या मतदाराचे नाव किंवा घर नंबर चुकीचा लिहिला आहे. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांचे देवनागरीत रुपांतर केले आहे. मात्र, त्यात अनेक चुका आढळून येत आहेत. या चुकांतील बहुतांश ठिकाणी घर क्रमांकाच्या जागेत देवनागरीतील याद्यात अनेकांचे घर नंबर गायब झाले आहेत. काहींच्या घर क्रमांकासमोर प्रश्नचिन्ह दाखविण्यात आले आहे. काहींच्या नावातील दुसरे किंवा पालकांचे नाव गायब झाले आहे तर काहींच्या गावातही चुका झाल्याचे आढळून आले आहे.

बीएलओंकडून दुरुस्ती

यादीतील चुकांच्या दुरुस्तीचे काम आयोगाने नेमणूक केलेल्या बीएलओंकडे सुपूर्द केले आहे. हे काम १७ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे. दुरुस्ती करणाऱ्या बीएलओंकडून आधारकार्ड ग्राह्य धरले जात नसून इतर कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यात लग्नाचा दाखला, नावावर घर असल्यास त्याचे कागदपत्र किंवा इतर कागदपत्रांचा त्यात समावेश होतो.

मतदारांमध्ये संताप

आयोगाने केलेल्या चुकीचे नाहक परिणाम सहन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्रस्त मतदारांकडून देण्यात आली. या दुरुस्त्या आयोगाकडून इंग्रजीतील याद्यानुसार कराव्यात, असेही मतदारांकडून सांगण्यात आले.

मतदार यादीमध्ये नावे, घर क्रमांक याबाबत असा काही प्रकार अद्याप आमच्या निदर्शनास आलेला नाही. जर असे काही घडले असेल तर त्याची योग्य दखल घेतली जाईल. - अनंत मळीक, मामलेदार, बार्देश

 

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूक 2024PoliticsराजकारणState Governmentराज्य सरकारVotingमतदान