शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत गोव्यास नगण्य स्थान

By admin | Updated: June 14, 2016 02:56 IST

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलाहाबादमध्ये पार पडली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अलाहाबादमध्ये पार पडली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही या बैठकीत भाग घेतला. दोन्ही दिवस बैठकीतील सारी चर्चा उत्तर प्रदेशमधील यापुढील निवडणुकीवर केंद्रीभूत होती. गोवा विधानसभा निवडणुकीचा विषय हा राष्ट्रीय कार्र्यकारिणी बैठकीत नगण्यच ठरला. उत्तर प्रदेश व अन्य मोठ्या राज्यांच्या तुलनेत गोवा हे खूपच लहान राज्य असल्याने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत गोव्यातील निवडणुकांबाबत फारच अल्प अशी चर्चा झाली. उत्तर प्रदेशमधील राजकारण, तेथील जातीय समीकरणे व त्या निवडणुका जिंकण्याबाबतची रणनीती याविषयीच बैठकीत सारी चर्चा झाली. गोवा विधानसभेची निवडणूक येत्या आठ महिन्यांत होणार आहे. त्याबाबतचे थोडे उल्लेख बैठकीत आले, असे सूत्रांनी सांगितले. गोव्याविषयी थोडीफार चर्चा बैठकीत झाल्याचा दावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. दरम्यान, वस्तू व सेवा कर (जीएसटी) विषयीच्या केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक उद्या मंगळवार व बुधवारी कोलकाता येथे होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, अर्थ खात्याचे सचिव दौलतराव हवालदार, वाणिज्य खात्याचे संचालक बांदेकर आदी कोलकाता येथे सोमवारी सायंकाळी दाखल झाले. आमचा जीएसटीला पाठिंबा आहे. बैठकीत जीएसटीचा मसुदा निश्चित केला जाईल, असे डिसोझा यांनी लोकमतला सांगितले. (खास प्रतिनिधी)