शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:18 IST

गेल्या सहा दिवसांत सुमारे दोनशे कोविडग्रस्तांचा जीव गेला पण त्याच काळात एकूण ११ हजार ३०५ कोविड रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

पणजी: गेल्या सहा दिवसांत सुमारे दोनशे कोविडग्रस्तांचा जीव गेला पण त्याच काळात एकूण ११ हजार ३०५ कोविड रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ते ठीक झाले. ८६५ रुग्णांना सहा दिवसांत इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला.

कोविडची दुसरी लाट ओसरू लागली आहे. कोविड रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र ही संख्या एकदमही कमी होताना दिसत नाही. फार वेगाने कोविडग्रस्तांची संख्या घटली असे झालेले नाही. सरकारने घरी विलगीकरणासाठी असलेला कालावधी सतरा दिवसांवरून दहा दिवसांवर आणला. मात्र लोकांनी बाहेर फिरताना मास्क वापरणे, सोशल डिस्टनसींग पाळणे व शक्य तो घरीच राहणे अशा प्रकारची उपाययोजना कायम ठेवणे गरजेचे आहे.

गेल्या सहा दिवसांत चाळीसहून कमी वयाचे अनेकजण दगावले. अन्य कसलीच व्याधी नसताना केवळ कोविडने घाला घातला व त्यामुळे जीव गमवावा लागला असे अनेक तरुणांबाबत झाले आहे. विविध वयोगटातील अजुनही ३० ते ४० रुग्ण मरण पावत आहेत. बहुतांश रुग्ण गोमेको इस्पितळात मरण पावतात, कारण तिथे गंभीर अशा कोविड रुग्णांनाच उपचारांसाठी आणले जाते. चाळीशी अजुनही न गाठलेले किंवा नुकतीच चाळीशी ओलांडलेले असे रोज सात किंवा आठ रुग्ण कोविडचे बळी ठरत आहेत. स्थिती एवढी गंभीर आहे. कळंगुटच्या भागात तर वयाची पंचवीशी देखील पार न केलेले दोन रुग्ण दगावले. सासष्टी, पेडणे, डिचोली, फोंडा, तिसवाडी या तालुक्यांतीलही कमी वयाचे काही रुग्ण कोविडचे बळी ठरले आहेत.

गेल्या सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांनी कोविडवर मात केली. यापैकी बहुतांशजण हे घरी विलगीकरणामध्ये राहून ठीक झाले तर सुमारे ८६५ रुग्ण इस्पितळात उपचार घेऊन यशस्वीपणे घरी परतले. रोज दीड ते दोन हजार रुग्ण ठीक होत आहेत. मात्र त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे लागतात. काही रुग्ण कोविडची लक्षणे दिसताच लगेच इस्पितळात दाखल होतात व त्यामुळे ते ठीक होतात असेही आढळून आले. काहीजण बेपर्वा पद्धतीने घरीच राहतात व मग शेवटच्या टप्प्यावर श्वास कोंडू लागला की, मग इस्पितळ गाठतात. काही रुग्णांना मृतावस्थेतच प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात आणले जाते.

तारीखनिहाय ठिक झालेल्या रुग्णांची संख्या व इस्पितळातून डिस्चार्ज मिळालेले रुग्ण - 

तारीख - ठीक झाले - डिस्चार्ज मिळालेले रुग्ण

२३ मे - २५४५ - १४५२४ मे - २३६२ - १४७२५ मे - २०८२ - १४४२६ मे - १३६३ - १३४२७ मे - १५५७ - १४१२८ मे - १३९६ - १५४ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसgoaगोवा