शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पक्षी मोर ठरणार ‘उपद्रवी’?

By admin | Updated: February 13, 2016 02:52 IST

पणजी : मोर हा राष्ट्रीय पक्षी असला, तरी गोव्यातील शेतकऱ्यांचे पीक तो नष्ट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मोरालाही ‘उपद्रवी पक्षी’ म्हणून जाहीर

पणजी : मोर हा राष्ट्रीय पक्षी असला, तरी गोव्यातील शेतकऱ्यांचे पीक तो नष्ट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मोरालाही ‘उपद्रवी पक्षी’ म्हणून जाहीर करण्याचा विचार सरकार करत आहे. माकडे व जंगली डुकरांप्रमाणेच मोरांकडूनही शेतकऱ्यांचे पीक नष्ट केले जाते. त्यामुळे मोरांनाही उपद्रवी पक्षी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीवर सरकारी अधिकाऱ्यांची समिती विचार करील, असे कृषिमंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. माकडे व जंगली डुकर शेतीचे नुकसान करत असल्याने त्यांना ‘उपद्रवी प्राणी’ म्हणून जाहीर करण्याचा विचार आम्ही विधानसभेतही व्यक्त केला होता. संबंधित समिती स्थितीचा आढावा घेईल व योग्य तो निर्णय घेईल, असे मंत्री तवडकर म्हणाले. डोंगराळ भागांमध्ये शेतकऱ्यांना मोरांचा उपद्रव आहे, असे ते म्हणाले. मोर देशात कुठेच उपद्रवी पक्षी म्हणून जाहीर केलेला नाही, हेही त्यांनी नमूद केले. माकडे व रानटी डुकर नियमितपणे शेतकऱ्यांची हानी करतात. काही प्राणी हे उपद्रवी म्हणून जाहीर करण्याची वेळच आली आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय निर्णयासाठी मुख्य सचिवांकडे सोपवला आहे. त्याविषयीची फाईल सध्या मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव यांच्याकडे आहे. या संदर्भात शेतकऱ्यांकडून सरकारकडे अनेक निवेदने आलेली आहेत. (खास प्रतिनिधी)