शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एफसी गोवाच्या सीईओपदी नंदन पिरामल यांची नियुक्ती

By समीर नाईक | Updated: September 11, 2023 18:40 IST

क्लब व्यावस्थापनात नेतृत्व बदल करण्यात आल्याने आता वेगळ्या घडामोडी येथे दिसणार आहे.

पणजी: भारतीय फुटबॉलमधील प्रमुख क्लब असलेल्या एफसी गोवाच्या अध्यक्षपदी नंदन पिरामल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सह-मालक आणि माजी अध्यक्ष अक्षय टंडन आणि रवी पुष्कर नव्या भूमिकेत दिसणार आहे, अशी माहीती एफसी गोवा क्लबने सोमवारी दिली.

क्लब व्यावस्थापनात नेतृत्व बदल करण्यात आल्याने आता वेगळ्या घडामोडी येथे दिसणार आहे. अक्षय टंडन यांनी त्यांच्या दैनंदिन ऑपरेशनल कर्तव्यातून माघार घेतली आहे. मात्र ते क्लबमध्ये सक्रीय राहणार आहे. अक्षय टंडन यांनी एफसी गोवाच्या इतिहासातील परिवर्तनात्मक कालखंडाचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने युवा विकास आणि तळागाळातील फुटबॉलमध्ये लक्षणीय प्रगती केली. स्थानिक खेळाडूंनामधून प्रतिभावंत खेळाडू शोधण्याच्या मोहिमेवर त्यांनी अधिक भर दिला होता.

नंदन पिरामल हे एफसी गोवा क्लबचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत तर रवी पुष्कर हे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून क्लबमध्ये नवीन आणि विस्तारित भूमिका बजावणार आहेत. आय-लीगमधील पुणे एफसीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी ओळखले जाणारे पिरामल हे नवा दृष्टीकोन आणि भरपूर अनुभवांसह एफसी गोवाचे क्लबचे नेतृत्व करणार आहे, असे क्लबने म्हटले आहे.

नंदन हे एफसी गोवा क्लबचे अध्यक्ष म्हणून सामील झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. खेळाबद्दलची त्यांची आवड आणि फुटबॉलचा लोकांवर होणारा परिणाम याबद्दलची त्यांची सखोल माहिती एफसी गोवासाठी आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, अक्षय यांनी देखील मोठ्या उत्कटतेने आणि मेहनतीने क्लबचे नेतृत्व केले आहे. - जयदेव मोदी, मालक, एफसी गोवा क्लब 

एफसी गोवा सोबतचा माझा प्रवास अभिमानाचा आणि पूर्ततेचा आहे. एफसी गोवा मध्ये कार्यरत असताना जे काही साध्य केले, विशेषत: युवा विकास आणि तळागाळातील फुटबॉलसाठी आमच्या वचनबद्धतेचा आम्हाला अभिमान आहे. नव्या वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्या तरी माझे मन एफसी गोवा क्लबशी जोडलेले असणार आहे. - अक्षय टंडन, माजी अध्यक्ष 

एफसी गोवा क्लब हा लोकप्रिय क्लबपैकी एक आहे. कोट्यावधी फुटबॉलप्रेमींवर राज्य करणाऱ्या एफसी गोवा क्लबसोबत जवळून काम करण्यास मी खुप उत्सुक आहे. एफसी गोवामध्ये सीईओची भूमिका स्वीकारताना खुप आनंद होत आहे. सांघिक यश मिळविण्यासाठी आणि क्लबला नवीन उंचीवर नेण्यासाठी मी माझे सर्वस्व प्रदान करेल. - नंदन पिरामल, नविन सीईओ

टॅग्स :goaगोवा