शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाना पाटेकरसह 76 व्यक्ती व संस्थांची नावे जाहीर, विषय जमीन झोन बदलाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 19:24 IST

शैक्षणिक संस्था आणि अनेक व्यक्तींनी मिळून प्रादेशिक आराखडा 2021 अंतर्गत 16 बी कलमाखाली स्वत:च्या जमिनीचा झोन बदलून मागितला आहे.

पणजी : राज्यातील अनेक राजकारण्यांचे नातेवाईक, अनेक हॉटेल्स, बिल्डर्स, शैक्षणिक संस्था आणि अनेक व्यक्तींनी मिळून प्रादेशिक आराखडा 2021 अंतर्गत 16 बी कलमाखाली स्वत:च्या जमिनीचा झोन बदलून मागितला आहे. अशा सर्व 76 अजर्दारांची नावे अधिकृतरित्या नगर नियोजन खात्याने शुक्रवारी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहेत. झोन बदलून मागणा:यांमध्ये अभिनेता नाना पाटेकरचाही समावेश आहे.

नगर नियोजन खात्याकडे झोन बदलासाठी अर्ज आल्यानंतर त्याविषयी खात्याने कोणती भूमिका घेतली व सरकारच्या नगर नियोजन मंडळाने कोणती शिफारस केली हे देखील तपशीलाने अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारीच्या तारखेने जारी झालेली ही अधिसूचना सरकारी राजपत्रत प्रसिद्ध केली गेली आहे. झोन बदलासाठी जर कुणाचाही आक्षेप असेल किंवा काही सूचना असेल तर येत्या दोन महिन्यांत सूचना व आक्षेप लोकांनी नोंदवावेत असे आवाहनही नगर नियोजन खात्याने केले आहे.

काही राजकारण्यांच्या पत्नी, भाऊ, अत्यंत जवळचे कार्यकर्ते यांच्या नावे अर्ज आले आहेत. काही शैक्षणिक संस्थांचे अर्ज आहेत तर काही हॉटेल्स आणि रियल इस्टेट व्यवसायिकांचे अर्ज आलेले आहेत. नाना पाटेकरने खोजरुवे- बार्देश येथे सुमारे पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन घेतलेली आहे. त्यापैकी काही जमीन ही सेटलमेन्ट झोनमध्येच येते. 17 हजार 200 चौरस मीटर जमीन ही इको-सेनसिटीव्ह क्षेत्रत येते. उर्वरित 7 हजार 728 चौरस मीटर जमीन ही सेटलमेन्ट झोनमध्ये बदलून देण्यास नगर नियोजन मंडळाने मान्यता दिली आहे.गोवा क्रिकेट असोसिएशनने म्हावळींगे व कुठ्ठाळी येथे क्रिडाविषयक उपक्रमांसाठी जमिनीचा झोन बदलून मागितला आहे. तो देण्याची शिफारस झाली आहे. तानिया इस्टेट्स अॅण्ड रिसॉर्ट्स, मेघा आजगावकर, राजेंद्र देशप्रभू, धाकू मडकईकर, अॅडवेन लाईफकेअर, प्रतिभा कुडचडकर, परेश गायतोंडे, अरुणा लोबो, बॅटर डिल कंपनी, वीर डेव्हलपर्स, जीत आरोलकर, मांद्रे हॉटेल्स, विष्णूदास बांदेकर, निलेश नाईक, प्रसाद साळगावकर, अर्चना हरमलकर, विल्सन फर्नाडिस, इमपेटस रियल इस्टेट, गोपाळ गावस, अरुण फळदेसाई, फ्लावियान फर्नाडिस, शेरॉन साल्ढाणा अशी अनेक नावे आहेत. यापैकी काहीजणांचे भूखंड छोटे आहेत व काहीजणांचे अगोदरच एकूण जमिनीतील काही भाग सेटलमेन्टमध्ये दाखविला गेला आहे. काहीजणांच्या जमिनी ऑर्चड व भात शेतीच्या आहेत.