शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘परफ्युम स्पेशालिस्ट’चा खून

By admin | Updated: October 8, 2016 04:41 IST

परफ्युम स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या मोनिका गुराडे (३९) हिचा निर्घृण खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले.

पणजी (गोवा) : परफ्युम स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या मोनिका गुराडे (३९) हिचा निर्घृण खून झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. पणजीपासून ६ किलोमीटरवरील पर्वरी परिसरात ही घटना घडली. पर्वरीतील बेलाविस्ता-सांगोल्डा येथे सपना राज वेली निवासी संकुल आहे. त्यातील जास्मीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक २मध्ये मोनिका राहत होत्या. हात-पाय बांधलेल्या स्थितीत, नग्नावस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यांच्यावर बलात्कार करून खून केल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मोनिका या पतीसोबत दुरावा निर्माण झाल्यानंतर जुलै २०१६पासून येथे भाड्याने राहत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मोलकरीण साफसफाई आणि स्वयंपाक बनविण्यासाठी आली तेव्हा मोनिका यांनी दार उघडले नाही. तिने मोबाइलवरून मोनिका यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मोलकरणीने मोनिका यांच्या मुंबईतील भावाशी संपर्क साधून वस्तुस्थितीची कल्पना दिली. मोनिका यांच्या भावाने मोनिकाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला फोन करून चौकशीची विनंती केली. शेजारच्या महिलेने मोनिका यांच्या पतीला बोलावून फ्लॅटचे दार उघडल्यावर सर्वांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. (प्रतिनिधी)