प्रकाश धुमाळ ल्ल म्हापसा पालिकेच्या निवडणुकीत आजी-माजी नगराध्यक्षांबरोबरच नगरसेवक आणि नवीन चेहऱ्याचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिलेले आहेत. पूर्वीच्या १५ प्रभागांचे २० प्रभाग झाले आणि या वीसही प्रभागांमधून ८६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत व प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. उमेदवारांनी मतदारांच्या व्यक्तिगत संपर्कावर भर दिला आहे. प्रभाग १ मध्ये चंद्रशेखर बेनकर, पुंडलिक भाईडकर, उदय नार्वेकर, सुशांत साळगावकर, प्रभाकर वेर्णेकर या पाच उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. प्रभाग २ मध्ये अल्पा भाईडकर, विशाल चोडणकर, राजेंद्र हरमलकर, मंगेश हरमलकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग ३ मध्ये विशांत ऐनापूरकर, मार्टिन कारास्को, मायकल कारास्को, सीताराम कानोळकर, फिरोज खान पठाण, प्रशांत मांद्रेकर, क्रिष्णा मयेकर, निखिल नार्वेकर हे आठजण रिंगणात उतरले आहेत. प्रभाग ४ मध्ये शैलेश हरमलकर, सुशांत हरमलकर, विठू परब यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग ५ मध्ये नताशा मयेकर व मधुमिता नार्वेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. या प्रभागाचे माजी नगराध्यक्ष अॅड. सुभाष नार्वेकर यांची सून नशीब अजमावत आहेत. ही लढत अटीतटीची होणार, असे बोलले जाते. प्रभाग ६ मध्ये अमजद खान पठाण, अनंत मिशाळ, वामन पंडित, प्रताप पेडणेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग ७ मध्ये फ्रान्सिस्को कार्व्हालो, सुभाष कळंगुटकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. यामध्ये गेले तीन वेळा सुभाष कळंगुटकर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तर फ्रॅन्की कार्व्हालो हे नव्या दमाचे युवक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग ८ मध्ये मर्लिन डिसोझा व गितांजली केरकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. यामध्येही मर्लिन डिसोझा यांच्या बाजूने मतदार आहेत. या माजी नगरसेविका आहेत तर त्यांचे पती पूर्वी उपनगराध्यही होते. गितांजली केरकर या प्रथमच उभ्या राहिल्या आहेत. प्रभाग ९ मध्ये सुदेश आरोलकर, विकेश आसोटीकर, रायन ब्रागांझा, मारिया कार्व्हालो, पंकज गोलतेकर, दिलीप नाटेकर आणि झुब्रीया शेख यांच्यात सप्तरंगी लढत होणार आहे. यामधील रायन ब्रागांझा हे माजी उपनगराध्यक्ष आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रभाग १० मध्ये सुजयकुमार नेत्रावळीकर, आशिष शिरोडकर, राजेंद्र तेली व तुषार टोपले यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. यामधील आशिष शिरोडकर हे या प्रभागमधून दोन वेळा निवडून आलेले आहेत; परंतु या वेळी आशिष शिरोडकर आणि तुषार टोपले यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. प्रभाग ११ मध्ये अॅनी आल्फान्सो, रेणुका भक्ता, फ्रिडा कुतिन्हो, फ्रिडा डिसोझा, तपस्या मयेकर यांच्यात पंचरंगी लढत होणार असली तरी रूपा भक्ता या प्रभागमधून दोन वेळा सतत निवडून आलेल्या असून दोन्हीही वेळा त्या नगराध्यक्षा झालेल्या आहेत. प्रभाग १३ जोसुवा डिसोझा, कमल डिसोझा यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. जोसुवा डिसोझा हे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे चिरंजीव आहेत. ते या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागमधून जोसुवा हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच कमल डिसोझा यांनी आपली उमेदवारी दाखल केल्याने जोसुवा यांचे बिनविरोध येण्याचे स्वप्न भंगले. प्रभाग १४ मध्ये सीमा नावेलकर, स्नेहा भोबे, रोशन कामत, मेघल कोरगावकर, दिप्ती लांजेकर, अलक्षा नाईक आणि प्रमिला शेटये यांच्यात सप्तरंगी लढत होणार आहे. हा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. प्रभाग १५ मध्ये विजेता नाईक, महेश शिरोडकर, स्वप्नील शिरोडकर, मनोजदमण वेर्णेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग १६ मध्ये गिताली दिवकर, विवा साळगावकर, शुभांगी वायंगणकर, श्वेता वाळके यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग १७ मध्ये वैशाली बर्डे, चंद्रकांत कोरगावकर, संदेश नाईक, राजसिंग राणे, नारायण राठवड, नंदकिशोर शिरगावकर यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. प्रभाग १८ मध्ये रोहन कवळेकर, अमय कोरगावकर, सुदेश तिवरेकर, प्रितम वाळके यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. यामध्ये रोहन कवळेकर हे यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु इतर तिघेही उमेदवार समाजकार्यात व युवा पिढीमध्ये सतत त्यांच्या बाजूने असतात. त्यामुळे या प्रभागमध्ये नव्या दमाच्या उमेदवाराला निवडून देण्याचा कल मतदारांत असल्याचे बोलले जाते. प्रभाग २० मध्ये कविता आर्लेकर, संगीता आर्लेकर, सुप्रिया हरमलकर, मोहिनी कोरगावकर, सुहासिनी सावंत, सोनिया सिंगणापूरकर आणि लीना ताळगावकर यांच्यात सप्तरंगी लढत होणार आहे.
म्हापशात बहुरंगी लढती
By admin | Updated: October 16, 2015 02:57 IST