शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी समाजाचे आंदोलन तूर्त स्थगित; फेररचना आयोग स्थापनेची मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2024 12:16 IST

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी फेररचना आयोग स्थापन करावा लागेल. तो लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थापन करून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीआधी राखीवता दिली जाईल. गरज पडल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळही केंद्रात नेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर, आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

विधानसभा, लोकसभेत राजकीय आरक्षण दिले जावे, या मागणीसाठी मोठ्या संख्येने एसटी समाजबांधवांनी सकाळी विधानसभेवर मोर्चा आणला. पोलिसांनी आधी तो मेरशी जंक्शनवर अडविला. त्यानंतरही आंदोलक पुढे आले. पुन्हा वाटेत मोर्चा अडविला असता, आंदोलकांनी मांडवी पूल रोखला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. सोळा जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आमदार वीरेश बोरकर, आपचे आमदार वेंझी व्हिएगश हे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार बोरकर म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन खरे की खोटे, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच. शनिवारी लक्षवेधी सूचनेवर आपण भाष्य करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. ते काहीतरी ठोस विधान करतील, या प्रतीक्षेत आम्ही आहोत. आजचा आमचा मोर्चा प्रतिनिधिक स्वरूपाचा होता. जेव्हा-जेव्हा एसटी बांधव मला हाक मारतील, त्या-त्यावेळी मी त्यांच्यासोबत आंदोलनात असेन.'

आंदोलकांचे नेते गोविंद शिरोडकर म्हणाले की, ही मागणी धसास लावण्यासाठी केंद्राकडे शिष्टमंडळ नेण्याची मागणी आम्ही केली. मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे केवळ प्रयत्न करून भागणार नाही, ठोस कृती हवी. या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच रजिस्टर जनरल ऑफ इंडियाकडे बोलल्याचे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सरकारने धसास लावावा. सरकारने आचारसंहितेचे वगैरे कारण देऊ नये, तसेच सध्या हे आंदोलन आम्ही स्थगित करीत असलो, तरी मागणी पूर्ण न झाल्यास आज जेवढे लोक आले, त्याच्या तिप्पट संख्येने लोक रस्त्यावर येतील, असे शिरोडकर म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्याआधी पुनर्रचना आयोग स्थापन करावा लागणार आहे, तो आम्ही करू. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडे फाइल पाठविली आहे. तेथून ती केंद्रीय गृहमंत्रालयाकडे जाईल. फाइल गृहमंत्रालयाने मंजूर केल्यानंतर पुनर्रचना आयोग अधिसूचित करावा लागेल. दोन दिवसांपूर्वी मी गृहमंत्रालयाशी पुनर्रचना आयोग स्थापन करण्याच्या अधिसूचनेबद्दल बोललो होतो. हे काम पूर्ण करून घेण्यासाठी माझे प्रयल सुरू आहेत. मी फाइलची सद्यस्थिती जाणून घेईन आणि त्यानुसार शनिवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तरदेईन.

 

टॅग्स :goaगोवा