शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी ३३,००० हून अधिक नोंदणी

By किशोर कुबल | Updated: February 2, 2024 15:03 IST

दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले; राज्यपालांचे अभिभाषण

किशोर कुबल, पणजी: २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले तर गोमंतकीयांचे दरडोई उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी गोव्यात ३३,००० हून अधिक कारागिरांनी नोंदणी केली आहे, असे राज्यपालांनी विधानसभेत अभिभाषणात स्पष्ट केले. मात्र धगधगता म्हादई विषय किंवा खाण व्यवसाय निश्चितपणे कधी सुरू होणार,याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी तासभर केलेल्या अभिभाषणातून सरकारची गेल्या वर्षभरातील उपलब्धी तसेच आगामी योजनांचा पाढा वाचला. राज्यपाल म्हणाले की, राज्याच्या अर्थव्यवस्थेने प्रचंड प्रगती दाखवली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये राज्याचे एकूण घरगुती उत्पन्न ३३ टक्क्यांनी वाढले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने १२ नव्या उद्योगांना मंजुरी दिली तसेच ९ उद्योगांच्या विस्तारकामासाठी परवानगी दिली. यातून ६८९ कोटी रुपये गुंतवणूक येणार असून ५,५६८ जणांना नोकऱ्या मिळतील.पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या ३० टक्के रिक्त जागा भरण्यात येत आहेत. १६१ होमगार्डना कॉन्स्टेबल म्हणून सेवेत घेतले आहे.'राज्यपाल म्हणाले की, 'मुख्यमंत्री अप्रेंटीशीप योजनेखाली सरकारी कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये ८,८५२ युवकांची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली.

चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील

राज्यपाल म्हणाले की, 'स्मार्ट सिटी स्टेट' म्हणून राज्य विकसित केले जाईल. लोकांना २४ तास पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून चालू वर्षातच १०० टक्के मलनि:सारण जोडण्या पूर्ण होतील. तसेच ४२.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही येणार आहे. साधन सुविधा विकास महामंडळाने गेल्या वर्षी १७३.२० कोटी रुपये खर्चाची १२ कामे पूर्ण केली असून १३ वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. ते येत्या वर्षभरात पूर्ण होतील. वीज क्षेत्रातही दहा पॅकेजमध्ये कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.खाणी कधी सुरू होणार काही स्पष्ट केले नाही परंतु खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर ट्रकवाल्यांना ग्रीन टॅक्स तसेच इतर करांच्या बाबतीत सवलत देण्यात येत आहे. १९८ अर्ज त्यासाठी मंजूर झाले आहेत., असे अभिभाषणात स्पष्ट करण्यात आले. अटल आसरा योजनेचा ४५९ एसटी बांधवांनी लाभ घेतलेला आहे.'

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024goaगोवा