पणजी : यंदा पाऊस एक आठवडा अगोदरच केरळात दाखल होण्याची शक्यता काही हवामान शास्त्रज्ञ आणि हवामान खात्याच्या माजी संचालकांनी व्यक्त केली आहे. मात्र, हवामान खात्याने अजून कोणतेही भाकीत केलेले नाही.नैर्ऋत्य मान्सून हा साधारणपणे १ जूनला केरळात दाखल होत असतो आणि त्यापूर्वी २५ मेपर्यंत अंदमान निकोबार द्वीपसमूहावर हजेरी लावत असतो. बंगालच्या उपसागरात आणि इतर ठिकाणी निर्माण झालेल्या विशिष्ट हवामानामुळे मान्सून नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर अगोदर येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या अंदाजानुसार २५ मेला मान्सून केरळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. ‘स्काय मेट’ या हवामानविषयक संशोधन करणाऱ्या खासगी संस्थेने येणारा पावसाळा कमी पाऊस देणारा ठरणार असल्याचे म्हटले आहे.हवामान खात्याचे माजी संचालकपी. व्ही. जोसेफ यांनीही पाऊस नियोजित वेळेपूर्वी येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांनुसार वाऱ्याच्या प्रवाहावरूनही हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरात ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सून २५ मे रोजीच केरळात?
By admin | Updated: April 14, 2017 02:46 IST