शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

‘त्या’ कैद्याकडून गुंतवणूकदारांना पैसा

By admin | Updated: January 12, 2015 01:53 IST

पोलिसांचा संशय : कित्येक कारनामे उघड होण्याची आशा

मडगाव : फैक मुश्ताक अहमद करंबेळकर (३५) हा मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधील पैसा गुंतवणूकदारांना पुरवत होता, असा पोलिसांचा संशय असून, अनेकांना गंडा घालून पोबारा केलेला जयंत नलावडेच्याही तो संपर्कात होता, अशीही माहिती आता पुढे आली आहे. नलावडे याच्याविरुध्द मडगाव पोलीस ठाण्यातच फसवणुकीचे तब्बल पाच गुन्हे नोंद असून, आतापर्यंत त्याने ३ कोटी ३४ लाखांचा गंडा घातला आहे. नलावडे याचे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशीही जवळचे संबंध असून, फैक याच्या अटकेमागील सूत्रधारही तोच असावा, अशी चर्चाही सध्या सुरू आहे. कालकोंडा येथे दोन दिवसांआधी ज्या ठिकाणी फैक याला पोलिसांनी अटक केली, तेथून जवळपासच नलावडे याने आलिशान कार्यालय थाटले होते. फैक हा अटक केलेल्या ठिकाणी अनेक वेळा येऊन जात होता, असे पोलीस दफ्तरी नोंद आहे. या पार्श्वभूमीवर फैकचे नालावडेशीही कनेक्शन असावे हा संशय बळावला आहे. पोलिसांनी तो राहात असलेल्या नागमोडे येथील घरात तसेच त्याच्या मित्राच्या घराचीही झडती घेतली आहे. मात्र, कुठलीही आक्षेपार्ह बाब तेथे आढळून आली नसल्याची माहिती मडगाव पोलिसांनी दिली. नलावडे हाही सध्या मडगाव पोलिसांना हवा आहे. एका प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर मागाहून जामीन मिळाल्यानंतर तो पळून गेला होता. सध्या दिल्लीत त्याचे बस्तान असल्याचे वृत्त आहे. पोलीसही त्याला दुजोरा देतात. मात्र, तो अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. रक्कम दुप्पट करून देणे तसेच फ्लॅट विकत देण्याचे आमिष दाखवून नलावडे याने लोकांना करोडोंचा चुना लावला आहे. (प्रतिनिधी)