शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉच्या साहाय्यक प्रोफेसरचा विनयभंग

By admin | Updated: April 16, 2017 02:41 IST

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील महिला साहाय्यक प्रोफेसरचा गोमेकॉच्या कार्यालयाच्या भिंतीवरच अश्लील मजकूर लिहून

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील महिला साहाय्यक प्रोफेसरचा गोमेकॉच्या कार्यालयाच्या भिंतीवरच अश्लील मजकूर लिहून विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. केवळ कर्मचाऱ्यांसाठीच खुल्या राहणाऱ्या या विभागात हा प्रकार घडला असला, तरी गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणात आगशी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गोमेकॉच्या शरीरशास्त्र विभागाच्या महिला साहाय्यक प्रोफेसरने आपला कार्यालयातच विनयभंग झाल्याची तक्रार नोंदविली आहे. गोमेकॉच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या या कार्यालयाच्या गच्चीत कर्मचारी सोडल्यास इतरांना जाण्याची परवानगी नाही. विद्यार्थीही तेथे जात नाहीत. त्याला लागूनच असलेला जुना फॉरेन्सिक विभागही आता नव्या इमारतीत हलविल्यामुळे या कार्यालयात केवळ मर्यादित माणसांचीच ये-जा असते. त्यामुळे हा उपद्व्याप करणारा कोणी बाहेरचा असण्याची शक्यता पोलीसही नाकारत आहेत. संशयित गोमेकॉचाच एखादा कर्मचारी, अधिकारी असण्याची शक्यताही नाकारली जात नाही. तसे असेल तर गोमेकॉची प्रतिष्ठा धुळीला मिळण्याचा धोका आहे.या प्रकरणात आगशी पोलिसांत तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी येऊन पंचनामा केला. भिंतीवर लाल रंगाने लिहिलेला हा मजकूर इंग्रजीत आहे. हे काम कोणी केले असावे, याबद्दल चर्चा चालू होती; परंतु ते लिहिताना पाहिलेला साक्षीदार नसल्यामुळे अज्ञाताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०९ अंतर्गत विनयभंगाची आणि कलम ३ अंतर्गत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(प्रतिनिधी)