शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आमदारांनी जोपासली मूर्तीकलेची परंपरा! स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

By किशोर कुबल | Updated: September 7, 2023 14:56 IST

मयें विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट स्वत: बनवताहेत गणेशमूर्ती

पणजी : गोव्यात मयें विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी मूर्तीकलेची परंपरा जोपासली असून यंदाही आमदार प्रेमेंद्र शेट व बंधूंनी चिकणमातीच्या तब्बल ५०० गणेशमूर्ती बनविल्या आहेत. चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. चित्रशाळा गजबजू लागल्या असून मूर्तीकारांचे कसब लागत आहे. अशावेळी कुंभारवाडा, मयें येथे स्थानिक आमदारही प्रेमेंद्र शेट हे कुंचला हाती घेऊन गणेशमूर्तींच्या रंगकामात व्यस्त आहेत.

आमदार प्रेमेंद्र हे गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष असून महामंडळाचा कारभार सांभाळताना सवड काढून ते मूर्तीकाम करत आहेत. त्यांचे थोरले बंधू माजी सभापती दिवंगत अनंत शेट हेही स्वत: गणेशमूर्ती बनवत असत. मयेंतील कुंभारवाड्यावरच तब्बल दहा हजार गणेशमूर्ती बनवल्या जातात, अशी माहिती प्रेमेंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.

‘लोकांनी प्रदूषणकारी पीओपीच्या मूर्ती विकत घेऊ नये. चिकणमातीच्याच मूर्तींचा आग्रह धरावा, असे कळकळीचे आवाहन करताना प्रेमेंद्र म्हणाले की,‘ गणेशमूर्ती बनवणारी ही आमची तिसरी पिढी आहे. थोरले बंधू माजी सभापती अनंत शेट यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र अमरेश व आम्ही तीन भाऊ मिळून सर्वांनी हा व्यवसाय चालूच ठेवला. प्रेमेंद्र म्हणाले की, ‘हस्तकला महामंडळ मूर्तीमागे शंभर रुपये याप्रमाणे प्रत्येक मूर्तीकाराला कमाल २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देते. रंग, चिकणमाती महागली आहे. दरवर्षी रंगांचे दर १० ते १५ टक्यांनी वाढतात. त्यामुळे अनुदानाच्या रकमेत थोडी वाढ करणे गरजेचे आहे.’

ते पुढे म्हणाले कि,‘ आम्ही घरातील मंडळी स्वत: मूर्ती बनवतो त्यामुळे फार कामगार लागत नाहीत. आई, वडिलांकडून मूर्तीकाम शिकलो. या कामात भरपूर कष्ट आहेत. चिकणमाती मळण्यासाठी आता पाच मूर्तीकारांना मिळून सामायिकपणे मशिन हस्तकला महामंडळाने दिले आहे. त्यामुळे माती मळण्याच्या कामात थोडी सुलभता आली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी मुळात इच्छाशक्ती हवी. आम्ही गणेशमूर्तीच नव्हे तर सरस्वती, कृष्णाच्या तसेच अन्य देव-देवतांच्या मूर्तीही ॲार्डर घेऊन करतो.’ बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हेही मूळ मयें येथील रहिवाशी होत. त्यांचे जुने घर मयेंमध्ये आहे. आर्लेकर हे या घरातच गणपती पुजतात व दरवर्षी चतुर्थीला मयें गावी येतात.               प्रवीण आर्लेकरांकडून स्तुतीमयेंचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी चिकणमातीपासून पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव हाच खरा गणेशोत्सव असल्याचे त्यानी म्हटले असून प्रेमेंद्र यांनी ही कला जोपासल्याने त्यांची स्तुती केली आहे.

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेशोत्सव