शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिल

By admin | Updated: May 3, 2015 01:16 IST

यंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांत दीड हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे व बारावीची परीक्षा दिलेल्यांत साडेतीन हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे

‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिलवासुदेव पागी ल्ल पणजीयंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांत दीड हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे व बारावीची परीक्षा दिलेल्यांत साडेतीन हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशावेळी मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ‘मिशन अ‍ॅडमिशन’ या वर्षी अधिक कठीण जाणार आहे.दहावीची परीक्षा २०,५०० विद्यार्थ्यांनी दिली आहे. मागील वर्षाच्या संख्येपेक्षा दीड हजारांनी ही संख्या अधिक असल्याची माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. ८५ टक्क्यांच्या आसपास निकाल लागत असल्यामुळे १७,५००च्या आसपास विद्यार्थी दहावीला उत्तीर्ण होतील. त्यामुळे निश्चितपणे अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार, असे संकेत आताच मिळू लागले आहेत. नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयांत विज्ञान शाखेत किमान ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश अर्ज दिले जात होते. मडगावमधील काही नामवंत उच्च माध्यमिक विद्यालयांत आवश्यक टक्केवारी ही ९० टक्के करण्यात आली होती. यंदा प्रवेश घेणारे विद्यार्थी वाढणार असल्यामुळे आवश्यक किमान टक्केवारीही (कटआॅफ) वाढण्याचे संकेत आहेत.‘चौगुले’त प्रवेश बंदप्रवेशाची समस्या उद्भवण्याचे संकेत मिळत असतानाच चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात यंदापासून अकरावीसाठी प्रवेश दिले जाणार नाहीत. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता इतर ठिकाणी जावे लागणार आहे. चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या शैक्षणिक वर्षात केवळ बारावीचे वर्ग चालतील.खात्यातर्फे पूर्वतयारी : शिक्षण संचालकयंदा दहावीला अधिक विद्यार्थी असल्यामुळे अकरावीला प्रवेशासाठी अधिक विद्यार्थी असतील, याची आपल्याला जाणीव असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले. गोवा शालान्त मंडळाकडून विद्यार्थ्यांची संख्याविषयक माहिती मिळविलेली आहे. त्यानुसार उपाययोजनाही चालविल्या आहेत. मडगावच्या चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश दिले जाणार नसले तरी, मडगावच्या इतर उच्च माद्यमिक विद्यालयांत आवश्यक त्या प्रमाणात जागा वाढवून देण्यात येणार आहेत, अशी माहिती भट यांनी दिली.