शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

डीपीआरला मंजुरी मिळाली म्हणजे रान मोकळे नव्हे: मंत्री सुभाष शिरोडकर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:50 IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे अज्ञान असल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : डीपीआरला मंजुरी मिळाली म्हणजे कळसा, भंडुरा प्रकल्पाचे काम करण्यास रान मोकळे मिळाले ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची समजूत हे निव्वळ अज्ञान आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले. प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी मुख्य वन्यप्राणी मंडळ, पर्यावरण खाते आदींची परवानगी लागेल, असे त्यानी सांगितले.

शिरोडकर म्हणाले की, 'म्हादईच्या बाबतीत गोव्याला केंद्राकडून न्याय मिळेल याबाबत शंका नाही. डीपीआरला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना मी भोपाळला भेटलो. त्यांनी गोव्यावर अन्याय होणार नाही, असे सांगितले आहे त्यामुळे म्हादईला नक्कीचसंरक्षण मिळेल याचा मला ठाम विश्वास आहे. शिरोडकर म्हणाले की, 'म्हादईचा विषय २००२ पासून जवळपास २१ वर्षे हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. डीपीआरला मंजुरी म्हणजे कर्नाटकने सर्वकाही मिळवले असे नाही.'

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेळगाव येथे जाहीर सभेत गोव्याशी सल्लामसलत करुनच म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय झाल्याचे जे विधान केले त्याबद्दल आपल्याला भाष्य करायचे नाही, असे शिरोडकर म्हणाले. शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हादईबाबत गोव्याला सांभाळतील याबद्दल आम्हाला खात्री आहे' असे ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा