शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पदभारानंतर मंत्री अ‍ॅक्शनमध्ये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 01:45 IST

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर

म्हापसा : राज्यात अनेक ठिकाणी आल्वारा भूखंड असून अशा प्रकारचे भूखंड गृहनिर्माण मंडळाच्या वतीने ताब्यात घेऊन त्यावर वसाहती बांधण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मत गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी व्यक्त केले आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित करण्यात आलेल्या गृहनिर्माण मंडळाला जास्तीत-जास्त महसूल प्राप्त करून देण्याचा व या मंडळातून जास्तीत-जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यक्षेत्राच्या विस्तारावर भर देताना राज्यात आल्वारा पद्धतीचे जे भूखंड आहेत ते भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न गृहनिर्माण मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून या भूखंडाचा फायदा अनेकांना होऊ शकतो, असेही ते म्हणाले. मंडळावर अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दुर्लक्षित मंडळ म्हणून गृहनिर्माण मंडळाकडे बघितले जाते. आपल्याला या मंडळाचे महत्त्व वाढवायचे असून मंडळाच्या महसुलातही वाढ करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची माहिती साळगावकर यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची योजना तयार केली आहे. देशतील एकही नागरिक बेघर राहणार नाही, यावर या योजनेद्वारे भर देण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री या नात्याने गोव्यातील लोकांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा व राज्यातही योजनेचा विस्तार करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विधानसभेत मांडणाऱ्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी विशेष तरतूद करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्तारितपणे चर्चा केली असल्याची माहिती साळगावकर यांनी देत अर्थसंकल्पासाठी तरतूद करण्याचे आश्वासन आपल्याला देण्यात आल्याचे सांगितले. गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आपल्या खात्याचा ताबा घेतल्यानंतर मंत्रालयात गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंडळाच्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली.दरम्यान, साळगाव मतदारसंघातील आमदार या नात्याने मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण तसेच पाण्याची सोय करून देण्यास प्राधान्य देण्यात येईल. कचरा प्रकल्पात पडून असलेल्या कचऱ्याची लवकरात-लवकर विल्हेवाट लावण्यावर आपला भर राहिल. या कचऱ्यामुळे त्या भागातील पाण्यावर परिणाम झाल्याने त्याला प्राधान्य देण्यात येणार असून मुख्यमंत्री पर्रीकरांसमवेत या प्रकल्पाला भेट दिली असता आपण त्यांचे लक्ष या प्रश्नावर वेधल्याचे साळगावकर या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)