शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

खाण घोटाळा - कारवारचे आमदार सतिशला दुसरा समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:09 IST

गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर समन्स बजालेले कारवारचे आमदार सतिश सैल हे एसआयटीपुढे हजर झालेच नाहीत.

पणजी: गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर समन्स बजालेले कारवारचे आमदार सतिश सैल हे एसआयटीपुढे हजर झालेच नाहीत. त्यामुळे त्यांना एसआयटीकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले असून आता शुक्रवारी मंगळवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.  गोव्यातील खाण घोटाळ्याशी सैल याचा संबंध आढळून आल्यानंतर  या घोटाल्याचा तपास करणाºया एसआयटीने त्याला समन्स बजावले होते. परंतु वैयक्तीक कारणांमुळे आपण येऊ शकत नसल्याचे पत्र त्यांनी एसआयटीला पाठविले असून सोमवारी उपस्थित राहण्यापासून आपल्याला मोकळीक देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तपासाला सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे.  दरम्यान एसआयटीकडून त्यांना दुसरा समन्स पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मल्लिकार्जून शिप्पींग प्रायव्हेट लिमिडेट या निर्यातदार कंपनीचे सतीश संचालक आहेत. गोव्यातून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात आलेला लोहखनीज हा ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ््यातील संशयित ट्रेडरच्या नोंदवहीत मल्लिकार्जून शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. तसेच त्यांचे ट्रेडरर्शी आर्थिक व्यवहारही झाले आहेत. त्याचे बंधू व कुटुंबातील इतर सदस्यांचाही या व्वयाहांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.