शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खाण लिज धोरण आज

By admin | Updated: August 18, 2014 01:21 IST

मसुदा विधानसभेत मांडणार : गैरव्यवहार केलेल्यांनाच लिज देण्याच्या तयारीमुळे पर्यावरणप्रेमी संतप्त

पणजी : जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या खाण लिज धोरणाचा मसुदा सोमवारी विधानसभेत सादर केला जाणार असून, त्यावर सभागृहात विशेष चर्चाही होणार आहे. खाण व्यवसायात यापूर्वी गैरव्यवहार केलेल्या खाणमालकांनाच पुन्हा लिज देण्याची तयारी सरकारने चालवल्याने पर्यावरणप्रेमी, अर्थतज्ज्ञ, तसेच समाजातील अन्य घटकांमधून संताप व्यक्त होत आहे. स्टॅम्प ड्युटी परत करण्याची तरतूद कायद्यात असतानाही त्याचा आधार सरकारने घेतलेला नाही, तसेच लिजांचा लिलाव करण्यासही सरकार तयार नाही यावरून ‘ये रे माझ्या मागल्या...’ हीच स्थिती पुन्हा ओढवणार आहे. ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी गोवा फाउंडेशनचे संस्थापक क्लॉड अल्वारीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ज्या खाण व्यावसायिकांनी गैरव्यवहार केले, त्यांच्याच हातात पुन्हा हा व्यवसाय सोपवायला सरकार निघाले आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी केला. ज्या २८ खाणमालकांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, त्यात खनिज मालाच्या बाबतीत अंडर इन्वॉयसिंग करणारे अनेकजण आहेत. खाण कायद्याच्या कलम ३७, तसेच कलम ३८चा भंग करणारेही आहेत. ते म्हणाले की, सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कायद्यात अशी तरतूद आहे की, कोणत्याही कारणास्तव लिज नूतनीकरण शक्य नसेल तर स्टॅम्प ड्युटी परत करता येते. या कलमाचा आधार घेऊन त्या २८ जणांना स्टॅम्प ड्युटी परत करता येते; परंतु सरकारला तसे करायचे नाही; कारण खाणमालकांशी लागेबांधे या सरकारला जोपासायचे आहेत. बहुधा याच कारणास्तव कायद्यातील वरील तरतुदीबाबत कोर्टालाही सरकारने अंधारात ठेवले असावे. सरकारला गोव्यातील खाण व्यावसायिक सोडून अन्य कोणाच्याही ताब्यात हा व्यवसाय द्यायचा नाही. त्यामुळेच हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्याच्याही मन:स्थितीत हे सरकार नाही. शहा आयोगाचा तिसरा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी २,४00 हून अधिक कोटी रुपये वसूल करणार असल्याचे जाहीर केले होते. ही वसुली करण्याचे सोडून त्याच खाण व्यावसायिकांना सरकार लिज देण्याचे घाटत आहे. (प्रतिनिधी)