शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

खाण प्रश्नी २१ जानेवारी रोजी गोवा बंद, काँग्रेसी आमदारांचाही पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:58 IST

राज्यातील लोह खनिजाच्या खाणी येत्या २0 जानेवारीपर्यंत सुरु न झाल्यास २१ जानेवारी रोजी गोवा बंद करू, असा इशारा खाण अवलंबितांनी दिला असून काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

पणजी : राज्यातील लोह खनिजाच्या खाणी येत्या २0 जानेवारीपर्यंत सुरु न झाल्यास २१ जानेवारी रोजी गोवा बंद करू, असा इशारा खाण अवलंबितांनी दिला असून काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सोळाही आमदार रस्त्यावर उतरतील, असे जाहीर करण्यात आले. खाण अवलंबितांनी आज दिवसभर येथील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण केले.संसदेच्या येत्या अधिवेशनात पहिले तीन दिवस गोव्यातील खाण अवलंबित दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणे धरणार आहेत. गोव्याचे काँग्रेसी आमदार या आंदोलनातही सहभागी होतील. खाणबंदीमुळे ज्यांना झळ पोचली आहे त्या सर्वांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी यावेळी जाहीर केले. सुमारे ५00 खाण अवलंबितांनी सकाळपासून आझाद मैदानावर लाक्षणिण उपोषण केले. सत्ताधारी भाजपचे आमदार, मंत्री तसेच काँग्रेसचे आमदार, खासदार नरेंद्र सावईकर आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनीही अवलंबितांची भेट घेऊन पाठिंबा दिला.सर्वात जास्त मी भोगले : दिगंबर कामतआमदार दिगंबर कामत म्हणाले की, खाणबंदीमुळे मोठे आर्थिक संकट गोव्यावर ओढवले असून लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांना न्याय न मिळाल्यास प्रसंगी आमदारकीचे राजीनामा देण्याची आमची तयारी आहे. सर्वच व्यवसायात बेकायदेशीपणाची काळी बाजू असते. मासळी विक्रीतही बेकायदेशीरपणा चालतो म्हणून काही संपूर्ण व्यवसायच बंद करावा अशातला भाग नाही. खाणी पूर्ववत सुरु व्हायलाच हव्यात. कामत पुढे म्हणाले की,  गोव्यात खाणी पोर्तुगीज काळापासून सुरु आहेत. केंद्राचा एमएमडीआर कायदा १९५७ साली आला. त्याआधी १९0६ पासून पोर्तुगीज काळात कन्सेशन्स पध्दतीवर खाणी चालू आहेत.कथित खाण घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेले कामत म्हणाले की, खाणीच्या प्रकरणात सर्वात जास्त मी भोगले. खाण अवलंबितांची बाजू घेऊन बोलतो म्हणून कोणी कितीही मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी पर्वा नाही. अवलंबितांबरोबर कुठेही आंदोलनात उतरण्याची आमची तयारी आहे. जंतरमंतरवरही आम्ही येऊ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी खाणबंदीमुळे राज्याचे अर्थकारण कोडमडले आहे, असा आरोप केला. किमान ४0 ते ५0 हजार लोक बेकार झाले आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खाणी पूर्ववत सुरु करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. अवलंबितांचे नेते पुती गांवकर यांनी यावेळी असे जाहीर केले की, संसद अधिवेशनाच्या काळात दिल्लीत जंतर मंतरवर पहिले तीन दिवस धरणे धरणार त्यात काँग्रेसी आमदारांनीही सहभागी होण्याचे आश्वासन दिलेले आहे.अशी आहे पार्श्वभूमीगोव्यातील खाणी सध्या बंद आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द ठरविले त्यामुळे १६ मार्चपासून खाणी पूर्णत: बंद आहेत. खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात ही मागणी घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. काँग्रेसी आमदारांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही यापूर्वी केंद्रीय खाणमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. परंतु खाणी सुरू करण्याच्या बाबतीत कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने वटहुकूम काढून खाणी पूर्ववत सुरू करता येतील, असे अवलंबितांचे म्हणणे आहे.