शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खनिजवाहू ट्रकचा उसगाव येथे बळी

By admin | Updated: May 29, 2016 02:05 IST

फोंडा : उसगावहून आमोणा येथे जाणाऱ्या भरधाव खनिजवाहू ट्रकने स्कूटरचालकाला धडक देऊन चिरडल्याने गांजे-उसगाव

फोंडा : उसगावहून आमोणा येथे जाणाऱ्या भरधाव खनिजवाहू ट्रकने स्कूटरचालकाला धडक देऊन चिरडल्याने गांजे-उसगाव येथील शुभम शशिकांत साखळकर हा १९ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तिस्क-उसगाव येथील कमला थिएटरसमोर शनिवारी सकाळी ९.१५ वाजता ही घटना घडली. ट्रकचालकाने ट्रक तेथेच ठेवून पळ काढला. फोंडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सरकारने खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना वेगमर्यादा घालून दिलेली असली, तरी जास्त खनिजाची ने-आण करण्यासाठी या मार्गावर भरधाव वेगाने ट्रक हाकले जात आहेत. त्यामुळेच हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खनिजवाहू ट्रक (क्र. जीए 0५ टी २५८७) उसगावहून आमोणा येथे जात होता. सिने कमला थिएटरजवळ पोहोचताच ट्रकची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटरला (क्र. जीए 0५ के. ७१३६) बसली व स्कूटरस्वार ट्रकखाली चिरडला गेला. ट्रक वेगात असल्याने घटनास्थळापासून ५-६ मीटर अंतरावर जाऊन थांबला. जखमी युवकाला जवळच असलेल्या पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अजय धुरी व हवालदार विनोद साळुंके यांनी पंचनामा केला. बांबोळीच्या गोमेकॉत उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. अपघातानंतर तिस्क-उसगाव ते कोडलीपर्यंतच्या रस्त्यावर खनिज भरलेल्या ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या. अधिक खनिजमाल नेण्यासाठी भरधाव वेगाने ट्रक हाकले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. शुभम साखळकर हा काही दिवसांपूर्वीच बारावी उत्तीर्ण झाला होता व जीव्हीएम-फर्मागुडी येथे प्रथम वर्षाला त्याने प्रवेश घेतला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोक कळा पसरली. (वार्ताहर)