शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी सामाजिक कार्यकर्त्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; हस्तक्षेप याचिका दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 13:01 IST

म्हादई जलतंटा लवादाने म्हादई प्रश्नी जो निवाडा दिला आहे, त्याला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. म्हादईबाबत एक नागरिक म्हणून आमचीही बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी यात त्यांनी केली आहे.

म्हादई जलतंटा लवादाने म्हादई प्रश्नी जो निवाडा दिला आहे, त्याला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. गोवा सरकारच्या या आव्हान याचिकेत ताम्हणकर यांनी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

ताम्हणकर म्हणाले, की एका बाजूने म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू देणार नसल्याचे विधान गोवा सरकार करीत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादई कर्नाटकला वळवण्यासाठी गोवा सरकारची मंजुरी घेतली होती असे विधान केले आहे. त्यामुळे एकूणच गोवा सरकारच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण होत आहे. त्यामुळे म्हादई प्रश्नी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रखरपणे बाजू मांडावी, एक नागरिक म्हणून न्यायालयाने आमचीसुद्धा बाजू ऐकून घ्यावी.

या विषयी गोवा सरकारच्या भूमिकेवर लक्ष ठेवावे, अशी मागणी या हस्तक्षेप याचिकेत केली आहे. आम्ही म्हादई ही आमच्याकडेच रहावी. कर्नाटककडे म्हादईचे पाणी वळवले जाऊ नये, त्यासाठीच आपण ही हस्तक्षेप याचिका सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा