शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी महाराष्ट्राची कर्नाटकला फूस?

By admin | Updated: February 12, 2016 03:57 IST

पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची लवादासमोरील भूमिका पाहिली तर महाराष्ट्रदेखील कर्नाटकसोबत आहे असे वाटू लागते,

पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची लवादासमोरील भूमिका पाहिली तर महाराष्ट्रदेखील कर्नाटकसोबत आहे असे वाटू लागते, अशी शंका गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. म्हादई नदीवर व या नदीशी निगडित सर्व नाल्यांवर मिळून एकूण १२ धरणे बांधण्याची योजना कर्नाटक सरकारने पुढे आणली आहे. महाराष्ट्रानेही चार धरणे बांधण्याची योजना पुढे आणली होती. गोव्याचे पाणीच बंद करायला महाराष्ट्र निघाले होते; पण गोवा सरकारने त्यास लवादासमोर ठामपणे आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रास एक पाऊल मागे घ्यावे लागले. बेळगावमधील काही व्यक्तींचाही म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या योजनेस विरोध आहे. बेळगावमधील लोकांनी त्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत लवादासमोर यायला हवे. दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका ही कर्नाटकच्या बाजूने असल्यासारखे दिसून येते, असे नाडकर्णी म्हणाले. दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये गुरुवारी ‘म्हादई पाणी तंटा व परिणाम’ याविषयी चर्चासत्र पार पडले. नाडकर्णी त्या वेळी बोलत होते. कर्नाटकची योजना यशस्वी झाली तर, दूधसागर व सुर्ल हे गोव्याचे धबधबे अगोदर बंद पडतील. त्यानंतर गोव्याच्या जैविक, जल व अन्य प्रकारच्या संपदेवर मोठा परिणाम होईल. गोव्याचे भवितव्यच अडचणीत येईल, असे नाडकर्णी म्हणाले. कर्नाटकच्या डावाविरुद्ध लढण्याबाबत आम्ही सगळेच संघटित आहोत. आमचा या लढ्यास पाठिंबा आहे, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे म्हणाले. (पान २ वर)