शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माध्यम विधेयकाला ठेंगा!

By admin | Updated: January 9, 2016 02:31 IST

पणजी : राज्यातील भाषाप्रेमी आणि पालकवर्गाला ज्याची प्रतीक्षा होती, ते प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचे विधेयक विधानसभेच्या

पणजी : राज्यातील भाषाप्रेमी आणि पालकवर्गाला ज्याची प्रतीक्षा होती, ते प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचे विधेयक विधानसभेच्या आगामी अधिवेशनात येण्याची शक्यता साफ मावळली आहे. विधेयक अद्यापही चिकित्सा समितीकडे असून त्यात सुधारणा करून ते मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. आगामी अधिवेशनात हे विधेयक येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापल्याचा अंदाज घेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काल दिले होते. या बैठकीची परिणती विधेयक लांबणीवर टाकण्यात झाली असून या चालीद्वारे सरकारने भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि ‘फोर्स’ या दोन्ही संघटनांच्या आंदोलनाची हवा काढून घ्यायचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या धोरणानुसार व मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या निर्णयानुसार डायोसेझन शिक्षण मंडळाच्या १३० इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान सुरूच राहील, असे पार्सेकर यांनी सांगितले. विधानसभा अधिवेशनास येत्या ११ रोजी आरंभ होत आहे. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाच्या चिकित्सा समितीची बैठक झाली. आमदार लवू मामलेदार वगळता समितीचे सगळे सदस्य या बैठकीस उपस्थित होते व त्यांनी विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याबाबत तपशीलवार चर्चा केली. मुख्यमंत्री म्हणाले की, पर्रीकर मंत्रिमंडळाने अल्पसंख्याकांच्या १३० इंग्रजी शाळांना अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनुदान सुरू राहील; पण मसुद्यात काही सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण, पर्रीकर मंत्रिमंडळाचा निर्णय आणि सध्याच्या विधेयकातील मसुद्यामधील तरतुदींमध्ये विसंगती आहे. चिकित्सा समितीच्या सदस्यांनी शुक्रवारच्या बैठकीत तरतुदींवर चर्चा केली. शिक्षण खात्याचे सचिव विरेंद्रकुमार यांनीही काही सूचना केल्या. त्यानुसार विधेयकाच्या मसुद्याचा शिक्षण खात्याने अधिक तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण खात्याकडे आम्ही अधिक माहिती तपशीलवार मागितली आहे. चिकित्सा समितीला आणखी एक बैठक घेऊन चर्चा करावी लागेल. देशाचे राष्ट्रीय शिक्षण धोरण सध्या तयार होत आहे. ती गोष्टही विचारात घेऊन मसुद्यात काही तरतुदी कराव्या लागतील. शुक्रवारी आमदारांनी अभ्यासपूर्ण अशा सूचना केल्या. आमदार नीलेश काब्राल, प्रमोद सावंत, राजन नाईक, दिगंबर कामत व माविन गुदिन्हो हेही समितीचे सदस्य आहेत. (खास प्रतिनिधी)