शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माध्यम विधेयक याच अधिवेशनात

By admin | Updated: January 3, 2016 01:42 IST

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक सादर होणार आहे. त्यासाठी

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक सादर होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी चिकित्सा समितीची बैठक बोलावणार आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांची शनिवारी येथील एका हॉटेलमध्ये तीन तास बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बैठकीतील चर्चेचा तपशील जाहीर केला. बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही; पण माध्यमप्रश्नी आम्ही विविध अंगांनी चर्चा केली. विषय समजून घेतला. प्रत्येक मंत्री, आमदाराने स्वत:चे मत व्यक्त केले. इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळांना सध्या सरकारी अनुदान मिळते ते बंद करायचे नाही, अशी भूमिका मी यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात मांडली होती. मी तरी त्या भूमिकेत बदल केलेला नाही; पण येत्या ११ रोजी विधानसभा अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी आम्ही चिकित्सा समितीची बैठक घेऊ. चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी मीच आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यम विषया-संबंधीचे विधेयक चिकित्सा समितीकडे आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, विधेयकाचे भवितव्य चिकित्सा समितीच्या बैठकीत ठरेल. विधेयकात कोणत्या दुरुस्त्या कराव्यात, कोणत्या नव्या सूचनांचा समावेश करावा किंवा करू नये, हे समिती ठरवील. मराठी किंवा कोकणीचा विषय पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयांमध्येही सक्तीने शिकविला जावा, अशी काही आमदारांची सूचना आहे. आमदारांमध्ये माध्यमप्रश्नी केवळ दोनच मते नाहीत किंवा केवळ दोनच गट नाहीत. विविध मतप्रवाह आहेत. प्रादेशिक आराखड्याबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाकेरी-बेतूल येथे होणाऱ्या ‘डिफेन्स एक्स्पो’च्या विषयाबाबत आपण आमदारांना माहिती दिली. ती जागा आम्ही तात्पुरतीच म्हणजे एका वर्षासाठीच दिलेली आहे. उद्योग सचिवांचे त्या विषयीचे पत्रही आपण वाचून दाखविले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला खासदार नरेंद्र सावईकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दत्ता खोलकर, सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. (खास प्रतिनिधी)