शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

माध्यम विधेयक लटकणार!

By admin | Updated: January 8, 2016 01:47 IST

किशोर कुबल ल्ल पणजी माध्यम विधेयकावरून वातावरण तापले असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजप

किशोर कुबल ल्ल पणजी माध्यम विधेयकावरून वातावरण तापले असल्याने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी भाजप मंत्र्यांची गुप्त बैठक घेऊन हे दुरुस्ती विधेयक पुढे न नेण्याचा सल्ला दिला. विधानसभेत हे विधेयक आले, तरी संमत होणार नाही, याची काळजी सत्ताधारी घेतील किंवा ते लांबणीवर टाकले जाईल, अशी व्यूहरचना आहे. इंग्रजी माध्यमाच्या ज्या १३२ प्राथमिक शाळांना अनुदान चालू आहे, त्या शाळांना ते चालूच ठेवावे, हा मंत्रिमंडळाचा निर्णय पुढेही अमलात राहील. मात्र, नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान द्यायचे नाही, असे ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इंग्रजी शाळांना अनुदानाचा मार्ग खुला करणारे माध्यम दुरुस्ती विधेयक संमत करून दाखवाच, असे आव्हान भारतीय भाषा सुरक्षा मंचने दिल्याने भाजपने ते गंभीरपणे घेतले आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर या प्रश्नी हस्तक्षेपासाठी दिल्लीहून दाखल झाले. गुरुवारी अज्ञातस्थळी त्यांनी मंत्रिमंडळातील भाजप मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत सहभागी झालेल्या एका मंत्र्याने सांगितले की, ११ रोजी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर भाजप मंत्र्यांची या प्रश्नावर पुन्हा एकदा बैठक होणार असून रणनीती ठरणार आहे. पर्रीकर यांनी भाजप आमदारांशीही या प्रश्नावर स्वतंत्रपणे चर्चा केली. दरम्यान, ‘भाभासुमं’ने विधेयकाला विरोध करीत येत्या रविवारी १० रोजी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पणजीत महामेळावा आयोजित केला आहे.