शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस, बीडीएस उमेदवार संभ्रमात

By admin | Updated: June 14, 2016 02:51 IST

वासुदेव पागी ल्ल पणजी वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया (काउन्सिलिंग) अजून निश्चित झाली नसल्यामुळे या दोन्ही

वासुदेव पागी ल्ल पणजी वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया (काउन्सिलिंग) अजून निश्चित झाली नसल्यामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी पात्र उमेदवार संभ्रमात पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सरकारने घातलेला घोळ ताजा असल्यामुळे, केला जात असलेला विलंब मात्र उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा ठरत आहे. एमबीबीएस आणि बीडीएससाठी पहिल्या फेरीतील काउन्सिलिंग जे १६ जूनला म्हणून जाहीर करण्यात आले होते, ते अचानक लांबणीवर टाकण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढेच नव्हे, तर १६ जून ही जाहीर करण्यात आलेली तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, याची कबुली खुद्द तांत्रिक शिक्षण संचालनालयानेच दिली आहे. अनिश्चिततेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नीट व सीईटीसंदर्भात झालेल्या आदेशाचे विश्लेषण हे निमित्त सांगण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या आदेशाचे अजून विश्लेषण होत नाही आणि काउन्सिलिंग ठरत नाही, हे कारण पटण्यासारखे नसल्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब झाला तर आयुर्वेदिक महाविद्यालये, होमियोपॅथिक महाविद्यालये, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, परिचारिका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर टाकावी लागणार आहे. अन्यथा बीडीएस व एमबीबीएसला मुकलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची संधीही हुकणार आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश न मिळाल्यास अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गोची होणार आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना काउन्सिलिंग लांबणीवर टाकण्याचा प्रस्ताव नेमका कोठून आला आणि का आला, याबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे. राजकीय दबावामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचेही काही अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम बंगाल व इतर काही राज्यांत या अभ्यासक्रमासाठी तारखा निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रात तर काउन्सिलिंगही झाले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करायला गोव्यालाच का इतका उशीर लागतो, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.