राजमोहन शेट्ये, कोरगाव, पेडणे
भाषेच्या उन्नतीसाठी किंवा भाषा समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली जाईल. भाषा भवन उभारणे, ग्रंथ व साहित्याचा प्रसार, ग्रंथालये, देशभरातील विद्यापीठे किंवा तत्सम इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार करण्यासाठी उपक्रम राबविणे, अशी कृती करण्यास वाव राहील.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आणि महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे. तर गोवा राज्याची अधिकृत सहराजभाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी तर भारतातील तिसरी भाषा आहे.
७०० वर्षांपूर्वीपासून पूर्व वैदिक, वैदिक, संस्कृत, पाली प्राकृत, अपभ्रंश अशा अनेक टप्प्यांतून मराठी भाषा विकसित होत गेली. मराठीतील पहिले वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके ९०५ मधील असून "श्री चामुंडेश्वराय करवियले" असे आहे. या भाषेचे जनक कोण असा प्रश्न पडला तर, थोर विचारवंत व संस्कृत आणि मराठी भाषेचे गाढे अभ्यासक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री बाळाजी जोशी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मराठी भाषेच्या बोली तशा दोन प्रकारात विभागल्या गेल्या. एक प्रमाण मराठी आणि दुसरी वन्हाडी मराठी. मराठीवर प्रभाव असलेल्या इतर भाषांमध्ये कोळी, अहिराणी आणि मालवणी कोकणी यांचा समावेश होतो. खानदेशी म्हणजेच अहिराणी ही खानदेश प्रदेशात बोलली जाणारी हिंद आर्यभाषा आहे. मराठीचा उगम महाराष्ट्र प्राकृत सातवाहन आणि वाहकारक राजघराण्याची अधिकृत भाषा म्हणून सामान्य युगाच्या सुरुवातीच्या शतकात विकसित होताना आढळते.
. मराठी सुमारे १००० इसवी सन पासूनची भाषा आहे, असे संशोधक सांगतात. मराठी भाषा साधारण व्या शतकापासून प्रचलित झाली. मराठीचा उगम संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्र या बोलीभाषेपासून झाला, असे सर्वजण मानतात. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्र भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते. हा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीने किमान २३०० वर्षांपूर्वी मराठी अस्तित्वात असल्याचा त्यावेळी दावा केला. मराठी भाषेला खरी व्यापकता आणून दिली ती संत ज्ञानेश्वरांनी. ते खन्या अर्थाने पहिले मराठी साहित्यिक म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर, नामदेव आर्दीनी भाषेचा उद्धार केला. पुढे . पुढे गोव्यातील ख्रिश्चन धर्म प्रसारक थॉमस स्टीफन यांनी लिहिलेले खिस्त पुराण १६१६ मध्ये प्रकाशित झाले याची जी नोंद मिळते, यावरून या भाषेची महती लक्षात येते. या ख्रिस्त पुराणात मराठी आणि कोकणी शब्दांचा मिलाफ आढळतो. मराठा साम्राज्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात, १७व्या शतकात मराठी साहित्याला आणि भाषेच्या विकासाला गती आली. मराठी नाटकानेसुद्धा मराठी समृद्ध होण्यास फार मदत केली, असे निदर्शनास येते.
मराठी भाषेची दीड-दोन हजार वर्षांपूर्वीची व्युत्पत्ती, समृद्ध साहित्य परंपरा यामुळेच आज ही भाषा अभिजात ठरली आहे. पण अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, आता पुढे काय? असा जर प्रश्न उभा ठाकला, तर आता शैक्षणिक भाषा विकास आणि भाषिक संशोधन होण्याची खरी गरज आहे. या दृष्टीने शाळा, विद्यालये, महाविद्यालये खरीच सक्षम आहेत का? विद्यापीठे या भाषेच्या उन्नतीसाठी अधिक संशोधनात्मक वातावरण निर्मिती करतात का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. हे केले तर खऱ्या अर्थाने मराठी भाषिक राज्ये अधिक सक्षम होतील. या निमित्ताने भाषिक व्यवहार तर वाढणार आहेच, मात्र भाषा विकसित होताना रोजगारही निर्मिती होऊ शकते, ही आजच्या व्यावहारिक जगात फार मोठी उपलब्धी म्हणता येईल. अनेक भाषा अभ्यासक, तज्ज्ञ भाषा विकसित करून, उपलब्ध साहित्य चोखंदळपणे अभ्यासून, त्यांचा दर्जा वाढविण्यास योग्य कृती करू शकतील. भाषेचे प्राचीन ग्रंथ जतन संवर्धन करण्याच्या दृष्टीने आधुनिक प्रक्रिया शोधण्यास आणि उपलब्ध निधीमुळे ती गरज सोडवणे सोपे होईल. डिजिटल युग असल्याने डिजिटलायझेशन होणे महत्त्वाचे आहे. आता ते काम अधिक सोपे होऊ शकते.