शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकरांनी स्वीकारला पदभार

By admin | Updated: March 15, 2017 15:45 IST

गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन आपल्या केबिनचा ताबा घेत कामास आरंभ केला.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 15 - गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन आपल्या केबिनचा ताबा घेत कामास आरंभ केला. गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर पर्रीकर शनिवापर्यंत अन्य खात्यांचे वाटप करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी चौथ्यांदा शपथ घेतली. पर्रीकर यांच्याव्यतिरिक्त आणखी नऊ मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.
 
शपथविधी सोहळ्यावेळी मुख्यमंत्री शब्दाऐवजी मंत्री म्हणून शपथ घेत आहे, असा पर्रीकर यांच्याकडून चुकून उल्लेख झाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा शपथ घेतली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर, बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर व भाजपाचे फ्रान्सिस डिसोझा, पांडुरंग मडकईकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे यांनीही शपथ घेतली.
 
प्रादेशिक पक्षांचाच पुढाकार - पर्रीकर
प्रादेशिक पक्षांनीच पुढाकार घेऊन हे सरकार स्थापन केले आहे. गुरुवारी आम्ही बहुमत सिद्ध करू. काँग्रेसला स्वत:च्या १७ आमदारांना बसमधून राजभवनवर आणावे लागले. जर ते स्वतंत्र कारमधून गेले असते, तर एखादी कार मध्येच गायब झाली असती. - मनोहर पर्रीकर, नवनियुक्त मुख्यमंत्री (खास प्रतिनिधी )