शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मासे स्वस्त करा

By admin | Updated: August 13, 2016 02:02 IST

पणजी : राज्यात फलोत्पादन विकास महामंडळ ज्याप्रमाणे भाजी अनुदानित दराने विकते, त्याप्रमाणे माशांवरही अनुदान देऊन

पणजी : राज्यात फलोत्पादन विकास महामंडळ ज्याप्रमाणे भाजी अनुदानित दराने विकते, त्याप्रमाणे माशांवरही अनुदान देऊन ग्राहकांना ते स्वस्त दरात दिले जावेत, अशी मागणी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत एका ठरावाद्वारे केली. मात्र, सरकारने ठोस असे आश्वासन या ठरावावर दिले नाही. गोव्यात जर भाजी अनुदानित दराने विकली जाते तर मग मासळी का म्हणून अनुदानित दराने विकली जात नाही, गोमंतकीयांना अतिशय महाग मासळी का खावी लागावी, अशी विचारणा आमदार सरदेसाई यांनी केली. परप्रांतीय मासे विक्रेते दुचाकी घेऊन व सायकल घेऊन घरोघर जाऊन आता मासळी विक्री करतात, असे सरदेसाई म्हणाले. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व दिगंबर कामत यांनीही या ठरावाचे समर्थन केले. माशांची विक्री करत सरकारचे जे वाहन फिरते त्यामुळे मासे स्वस्त झाले असे एकाही व्यक्तीला वाटत नाही; कारण ते स्वस्त झालेलेच नाहीत, असे रेजिनाल्ड म्हणाले. गोवा विकास पक्षाचे आमदार कायतू सिल्वा यांनी माशांची बाजारपेठ रापणकार व अन्य गोमंतकीय मच्छीमारांच्या हातात राहिलेली नाही, असे सांगितले. आमदार सरदेसाई व कायतू यांच्यात एका विषयावरून या वेळी थोडावेळ जोरदार वादही झाला. वेळ्ळीचे अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा यांनी सर्वच ट्रॉलर व्यावसायिक श्रीमंत नाहीत, असे सांगितले. पूर्वी जे ट्रॉलर व्यावसायिक या धंद्यात होते, ते कंगाल बनल्याचेही ते म्हणाले. उत्तरादाखल बोलताना मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी सांगितले, की सरकारच्या पाच वाहनांमधून सध्या मासळी विक्री केली जाते. आणखी पाच वाहने लवकरच सुरू केली जातील. त्यानंतरही जर लोकांची मागणी आली तर आणखीही मासळी विक्रीसाठी वाहन संख्या वाढवली जाईल. खात्याकडून मोबाईल पद्धतीने मासळी विक्री सुरू आहेच. शिवाय मच्छीमार व्यवसायाशी निगडित विविध घटकांना अनुदान देणे, अर्थसाह्य देणे व अन्य योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही या वेळी बोलले. आम्ही विविध योजना राबवत असून भविष्यात जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा माशांवर अनुदान देण्याबाबतही एखादी योजना आणण्याचा विचार होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून आमदार सरदेसाई यांना ठराव मागे घेण्याची विनंती केली. सरदेसाई यांनी ठराव मागे घेतला. (खास प्रतिनिधी)