शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजोर्डा कॅसिनो मारहाण प्रकरण : माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेकोच्या आव्हान अर्जावर उद्या सुनावणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:59 IST

माजोर्डा कॅसिनो धक्काबुक्की प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको आणि त्यांचा मित्र मॅथ्यू दिनिज यांच्या विरोधात  मडगाव न्यायालयाने दाखल करुन घेतलेले आरोप रद्द करावेत यासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

मडगाव:  माजोर्डा कॅसिनो धक्काबुक्की प्रकरणात गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको आणि त्यांचा मित्र मॅथ्यू दिनिज यांच्या विरोधात  मडगाव न्यायालयाने दाखल करुन घेतलेले आरोप रद्द करावेत यासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. गेल्या वेळेला अतिरिक्त सत्र न्या. एडगर फर्नाडिस यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी होऊन 23 ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला होता.मॅथ्यू दिनिज याने प्रथमश्रेणी  न्यायलयाच्या आरोप निश्चितीच्या आदेशास सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.  अॅड. विवेक नाईक यांनी या प्रक़रणात बाजू मांडली होती. कोलवा पोलिसांनी पाशेको  व दिनिज यांच्या विरोधात भादंसंच्या 341, 352 व 506 (2) या कलमाखाली आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, पाशेको हे गोव्याचे पर्यटनमंत्री असताना 31 मे व 1 जून 2009 दरम्यानच्या रात्री माजोर्डा कॅसिनोत बेट लावण्याच्या  कारणावरुन ही धक्काबुक्की झाली होती. या प्रकरणी कॅसिनोचे मुख्य व्यवस्थापक अशोककुमार राव यांनी तक्रार दिली होती. तब्बल 9 वर्षानंतर हे प्रकरण न्यायालयासमोर आले असता मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आश्विनी कांदोळकर यांनी पाशेको व दिनिज यांच्याविरोधात आरोप निश्चितकरुन सुनावणी चालू करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला दिनिज यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.माजोर्डा येथील कॅसिनोतील धक्काबुक्की व मारहाण प्रकरणी यापूर्वी दाखल केलेल्या आणखी एका आरोपपत्रच्या सुनावणीत पाशेको व दिनिज यांना आरोपातून मुक्त करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या अशिलाला या दुस-या आरोपपत्रतूनही मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद वकील विवेक नाईक यांनी केला आहे.या मारहाण प्रकरणात क्राईम ब्रँचने माजोर्डा कॅसिनोचे मुख्य व्यवस्थापक जेराल्ड फर्नाडीस यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार मिकी पाशेको व त्याचा मित्र मॅथ्यु दिनिज या दोघांवर आरोपपत्र दाखल केले होते.  या खटल्याची सुनावणी होउन दोघांही संशयितांना आरोपातून मुक्त करण्याचा आदेश डिसेंबर 2015 साली मडगावच्या मुख्य प्रथमश्रेणी  न्यायालयाच्या न्यायाधीश कल्पना गावस यांनी दिला होता.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय