शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लुईस बर्जरला मी नेमले नव्हते!

By admin | Updated: July 22, 2015 01:25 IST

मडगाव : २00 कोटींच्या ‘जैका’ जलयंत्रणा प्रकल्पासाठी लुईस बर्जर या कंपनीसोबत सल्ल्यासाठी ७0 कोटींचा मोठा व्यवहार झाला. असे असतानाही ज्या

मडगाव : २00 कोटींच्या ‘जैका’ जलयंत्रणा प्रकल्पासाठी लुईस बर्जर या कंपनीसोबत सल्ल्यासाठी ७0 कोटींचा मोठा व्यवहार झाला. असे असतानाही ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हे सर्व व्यवहार झाले, त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी सध्या ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. ही सल्लागार कंपनी नेमण्याच्या निर्णयात आपला कुठलाही सहभाग नाही आणि या कंपनीने कुठले व्यवहार केले, याचीही आपल्याला कल्पना नाही, असा खुलासा त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. जैका प्रकल्पासाठी लुईस बर्जर या कंपनीला सल्लागार कंपनी म्हणून नेमण्याच्या निर्णयात आपला कुठलाही सहभाग नव्हता आणि आपण कधीही या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो नाही, असे आलेमाव यांनी सांगितले. आपण जरी त्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असलो, तरी या संदर्भात जे काही व्यवहार झाले, त्याची आपल्याला सुतराम कल्पना नव्हती, असे ते म्हणाले. सल्लागार कंपनीकडून पैसे घ्यायचे असतात, हेही मी पहिल्यांदाच ऐकतोय. मात्र, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना याबाबतची अधिक माहिती असावी. ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच लुईस बर्जर कंपनीला १४ कोटींचे कंत्राट दिले होते. या व्यवहारात कंपनीकडून किती लाच मिळाली, याचीही चौकशी सीबीआयने करावी, असे आवाहनही त्यांनी केले. लुईस बर्जर लाचखोरी प्रकरण सध्या राष्ट्रीय पातळीवरील विषय बनला असून देशातील विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत. हे सर्वजण पर्रीकरांच्या आमंत्रणावरून गोव्यात दाखल झाले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. जैकासंदर्भात कसलेही व्यवहार झाले असतील, तर ते जपान कंपनीकडून झाले आहेत. त्यात गोवा सरकारचा काहीही हात नाही. असे काही व्यवहार झाले असतील, तर याचा खुलासा तुम्ही या प्रकल्पाचे मुख्य अभियंते ए. वाचासुंदर यांच्याकडे मागा, असे आलेमाव म्हणाले. मनोहर पर्रीकर यांना हा राजकारणाचा मुद्दा बनवायचा आहे. त्यामुळेच ते संदर्भहीन वक्तव्य करतात. आपले अपयश झाकण्यासाठीच ते आता अपप्रचार करू लागले आहेत, असे आलेमाव म्हणाले. यापूर्वी काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना गोव्यावर आठ हजार कोटींचे कर्ज होते. पर्रीकर मुख्यमंत्री असताना ते १३ हजार कोटींवर पोचले. याच पर्रीकरांनी खाण कंपन्यांकडून ३५ हजार कोटींची वसुली केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच कॅसिनो मांडवीबाहेर काढले जातील, अशी ग्वाही दिली होती; पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर खनिज उद्योगाकडून एक पैही वसूल केली नाही आणि मांडवीतील कॅसिनो बाहेर जाण्याऐवजी त्यात आणखी एका महाकॅसिनोची भर पडली, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)